हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नौटंकी करणा-या निलेश लंके महाविकास अघाडी सरकारच्या काळात मंदिर बंद असताना गप्प का बसले होते? असा सवाल पारनेर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी उपस्थित केला.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात विजय औटी यांनी म्हटले आहे की, ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोव्हीड संकटात जाणीवपुर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्या भावनांशी खेळ केला गेला तेव्हा निलेश लंके शब्दानेही बोलले नाहीत.
कोव्हीड सेंटरमध्ये किर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्हणून आग्रही का राहीले नाहीत? हनुमान चालीसा म्हटली म्हणून आ.राणा दांम्पत्यांना जेलमध्ये टाकेले तेव्हा लंके यांची हनुमान भक्ती कुठे गेली होती.
पालघर मध्ये दोन साधुंची हत्या झाली तेव्हाही लंके काही बोलले असे आठवत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर कोर्टात प्रश्न उपस्थित करणा-या कॉग्रेस पक्षाचे पाठबळ घेवून लंके आज उमेदवारी करतात. लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य आहे का? असा प्रश्नाही विजय औटी यांनी उपस्थित केला.
हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहुन अर्ज दाखल करण्याची लंके यांची नौंटकी ही केवळ सहानुभूती निळविण्यासाठी असली तरी, त्यांच्या नौंटकीला समाज मुलनार नाही. गदा नाचवली म्हणून कोणी पहीलवान होत नाही असा टोला लगावतानाच महाविकास आघडीचा जनाधार संपल्यामुळेच आता देव देवतांची आठवण होवू लागील असल्याचे औटी यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.