अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे.

हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….

भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली .

महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित केले होते.

हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार

त्यानंतरही भाजपाने अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी भाजपने ऐनवेळी खेडकर व आठवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केले होते,

सभागृहात संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष महाविकास आघाडीत असल्याने बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ त्यांच्याकडे होते.

हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

शालिनी विखे यांनी निवडणुकीत त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता, तसेच त्या काँग्रेसमध्येच असल्याचे त्या सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने घुले व शेळके यांना उमेदवारी दिली होती.

भाजपकडून सुनीता खेडकर व उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला होता.भाजपने दोघांचे अर्ज दाखल केले होते, मात्र दोघांनीही अर्ज माघारी घेतले. 

हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !

त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राधाकृष्ण विखे यांनी घेतला. त्यामुळे घुले व शेळके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. 

राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. 

हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com