अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कामिका एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भरणारी रथयात्रा प्रशासनाने रद्द केली आहे.

एकादशीच्या दिवशी कोणतेही दिंड्या किंवा इतर कोणतेही धार्मिक उपक्रम होणार नाहीत. मानकरी व पुजारी हे सकाळी मंदिरामध्ये विधिवत पूजा करतील एवढाच कार्यक्रम होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर महत्वाची बाब म्हणजे कर्जतमध्ये सर्व व्यवहार आस्थापना दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावावरून नागरिकांनी येऊ नये यानिमित्ताने मंदिर व परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

या निमित्ताने पोलीस प्रशासनाने कर्जत शहरामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यावर आज नाकाबंदी केली होती. बाहेर येणाऱ्या नागरिकांची चौकशी देखील यावेळी पोलीस प्रशासनाने केली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी करोना विषाणूच्यापार्श्वभूमीवर कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज यांची राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी रथयात्रा रद्द करण्यात आली आहे.

एवढेच नव्हे तर दोन दिवस म्हणजे मंगळवार बुधवार कर्जत शहरातील सर्व आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने व ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी घेतला आहे