Almond Farming: सुकामेवा म्हटले की, सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते बदामाचे (Almond Crop) चित्र. आपणा सर्वांना बदामाचे सेवन नक्कीच आवडत असेल. मित्रांनो बदामाची आता भारताबरोबरच परदेशातही मागणी वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

खरं पाहाता बदामात असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहेत. आहारतज्ञ तसेच डॉक्टर देखील बदाम सेवन करण्याचा सल्ला देत असतात. आज बदाम हे केवळ मानवाच्या आरोग्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते शेतकऱ्यांचे उत्पन्नही (Farmer Income) अनेक पटींनी वाढवू शकते. बदाम नटांच्या श्रेणीत येतो.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पूर्वी बदामाची लागवड (Almond Cultivation) फक्त जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येथे केली जात होती, परंतु आता शेतीच्या (Farming) आधुनिकीकरणामुळे आणि सुधारित वाणांमुळे, बदामाची लागवड भारतात सर्वत्र केली जाऊ लागली आहे.

आपल्या राज्यात देखील अनेक शेतकरी (Farmer) बदाम लागवड करतात. काही शेतकरी व्यावसायिक स्तरावर बदामाची शेती (Commercial Almond Farming) करत आहेत आणि चांगले उत्पन्न देखील मिळत आहेत. अशा परिस्थितीत आज आहे आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी बदामाच्या काही सुधारित जातींची (Almond Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया बदामाच्या सुधारित आणि प्रगत जाती.

बदामाच्या काही प्रगत जाती (Some Improved Varieties Of Almond):- कृषी क्षेत्रातील जाणकार लोक दावा करतात की, बदामाची व्यावसायिक लागवड करून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. बदामाची बारामाही बाजारात मागणी असल्याने या पिकाचे उत्पादनही हातोहात विकले जाते आणि शेतमालाची साठवणूक करण्याचा कोणताही त्रास शेतकऱ्यांना होत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, व्यावसायिकदृष्ट्या बदामाच्या अनेक जाती जगभरात प्रसिद्ध आहेत.

यामध्ये नॉन-पॅरील, कॅलिफोर्निया पेपर शेल, मर्सिड, IXL,शालिमार, मखदूम, वारिस, प्रनायाज, प्लस अल्ट्रा, प्रिमोर्स्की, पीअरलेस, कार्मेल, थॉम्पसन, प्राइस, बट्टे, मॉन्टेरे, रुबी, फ्रिट्झ, सोनोरा इत्यादींचा समावेश आहे. बाजारातही बदामांच्या या जातीची मोठी मागणी असते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील बदामाच्या या जातीस सर्वोत्तम मानतात.

बदामाची मागणे बाजारपेठेत बारामाही असल्याने बदामाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कृषी तज्ञ सांगतात की बदाम एकदा लागवड केल्यास तब्बल पन्नास वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असतो. निश्चितच बदामाची शेती शेतकरी बांधवांना पन्नास वर्षे शाश्वत उत्पन्न देणारे साधन बनणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांचा तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घेऊन बदामाच्या सुधारित वाणाची निवड करणे अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे.