अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- तलवार बाळगने गुन्हा आहे. मात्र अनेकजण तलवार बाळगतात. कर्जत तालुक्यात गुन्हे करण्यासाठी तलवार बाळगणारे २ गुन्हेगार कर्जत पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजगाव येथील शाळेच्या टीव्ही चोरी करणारे फरार आरोपीचा मिरजगाव बेलगावच्या शिवारात शोध घेत होते. यावेळी गुप्त बतमीदाराने पोलिसांना माहिती दिली की, दोघेजन धारदार तलवार बाळगून आहेत  आणि ते गुन्हा करण्याची शक्यता आहे.

ते दोघे सध्या मिरजगाव परिसरात फिरत आहेत. दरम्यान मिरजगाव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड व निखिल राजेंद्र पवार (दोघे रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे दोघे एका मोटारसायकल वरून बेलगांवचे दिशेने जात असलेले दिसले.

त्यावेळी त्यांना पोलिसानी पकडुन त्याची झडती घेतली असता एक लोखंडी मुठ असलेली धारदार तलवार मिळुन आली. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.