file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  खेळण्या, बागळण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी नवरा मुलगा, मुलगी व मुलाचे आई- वडील या पाच जणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुलगी अल्पवयीन केवळ पंधरा वर्षाची असताना आरोपींनी तिचे लग्न लावले. या दरम्यान तिच्यावर शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली. या बाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा पती गोरक्ष शिवाजी वाघ (रा-खारेकर्जुने), अल्पवयीन मुलीचे आई, वडील, सासू चंदा शिवाजी वाघ, सासरा शिवाजी वाघ (रा-खारेकर्जुने) या पाच आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, बाल विवाह विरोधी कायदा,

बाल अत्याचार कलमांव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.