file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने जाहीर देखील केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत देशात ५० लाख भारतीयांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केलं आहे. तसेच, सर्वांसाठी मोफत लस या कार्यक्रमाचं कौतुक देखील केलं आहे. ५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारं ट्वीट केलं आहे.

“करोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १ कोटींहून जास्त नागरिकांना लस दिली आहे.

तर, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १० लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.