file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- चौघा वाळू तस्करांनी वाळू परमिटच्या कारणातून नीलेश सुपेकर (नांदूर खंदरमाळ) याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.

ही घटना मंगळवारी दुपारी येठेवाडी येथे घडली. सुपेकर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अण्णा वाडगे व अन्य तिघांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपअधीक्षक संजय सातव करीत आहे.

वाळू तस्करांची वाढती दादागिरी व प्रशासना वचक न राहिल्याने पठारभागात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.