file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान मुश्ताफ शेख (हातमपूर,अहमदनगर) असे नाव गुन्हा दाखलेल्याचे आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, युवती ही 2016 साली नगर मध्ये शिक्षण घेण्यासाठी आली होती. 2017 मध्ये युवती ही शिक्षण घेत असताना, सलमान शेख याचेशी युवतीची ओळख झाली.

यानंतर त्याचे मैञीचे प्रेमामध्ये रुपांतर झाले. या दरम्यान, शेख याने युवतीला हातमपूर येथे भाडोञी घर घेऊन दिले. यानंतर शेख हा युवतीच्या घरी नेहमी येत-जात होता.

यानंतर शेख हा नेहमी लग्नाचे आमिष दाखवून युवतीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत असे. फेब्रुवारी 2021 ला शेख याच्यापासून युवती ही गरोदर राहिली. यावेळी युवतीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यास शेख याने भाग पाडले.

त्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात सलमान मुश्ताफ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.