अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकास बेदम मारहाण करत गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न एकाने केला आहे.

याप्रकरणी निजाम शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी ईस्माईल महेमूद शेख (42, रा. नान्नज) यास अटक केली आहे.

त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निजाम शेख यांचे नान्नज येथे ब्ल्यू डायमंड नावाचे हॉटेल आहे.

संशयित ईस्माईल हा दुपारी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. जेवण झाल्यानंतर जेवणाचे बील हॉटेल मालक निजाम शेख यांनी मागितल्याचा राग आल्याने ईस्माईल यानेहॉटेल मालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर हॅाटेलमालकास पकडून दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर निजाम यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत पळ काढल्याने ते बचावले.

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ईस्माईल शेख विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक जानकर करत आहेत.