Renault च्या ‘या’ तीन कारवर मिळतोय 77 हजारांचा डिस्काउंट , वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Renault car : जर तुम्ही या येत्या दिवाळीत Renault कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. Renault आपल्या वाहनांवर 77,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

क्विड, ट्रायबर आणि काइगर या तिन्ही Renault कारवर ही सूट दिली जात आहे. या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय इतरही काही उत्तम डिस्काउंट दिल्या जात आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

Renault kwid

रेनो क्विडवर एकूण 62,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, ज्यात 20,000 रुपये कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत रॉयल्टी बोनस आणि 12,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट चा समावेश आहे.

त्याच्या अर्बन नाईट एडिशनमध्ये केवळ लॉयल्टी बोनस आणि एक्सचेंज डिस्काऊंट दिले जात आहेत. भारतीय बाजारात रेनो क्विडची किंमत 4.70 लाख रुपयांपासून 6.45 लाख रुपयांपर्यंत आहे.

Renault Triber

रेनो ट्रायबरवर एकूण 62,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे, ज्यात 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 12,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट चा समावेश आहे. याशिवाय याच्या आरएक्सई व्हेरियंटवर केवळ 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळत आहे. सर्व ऑफर्स इतर सर्व व्हेरियंटवर लागू आहेत.

रेनो ट्रायबरची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख ते 8.97 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. सध्या ही सर्वात स्वस्त सेवन सीटर एमपीवी आहे, जी फोर स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. ट्रायबर एकूण चार व्हेरियंट आणि 10 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 72 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. आणि यात पाच स्पीड मॅन्युअलसह पाच स्पीड एमिटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Kiger

Renault kiger वर एकूण 77,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, ज्यात 25000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 20000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 12000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट चा समावेश आहे.

लक्षात घ्या की, जास्तीत जास्त सूट फक्त सुरुवातीच्या व्हेरियंट आणि मिडल व्हेरियंटवर दिली जात आहे. याच्या टॉप मॉडेलवर केवळ 20000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. तर नुकत्याच लाँच झालेल्या अर्बन नाईट एडिशनमध्ये लॉयल्टी बोनससह एक्सचेंज बोनस मिळत आहे.

रेनो kigerची एक्स शोरूम किंमत 6.50 लाख ते 11.23 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. भारतीय बाजारपेठेत हे एकूण पाच व्हेरियंट आणि 11 कलर ऑप्शनसह येते. ही फुल फाइव्ह सीटर एसयूव्ही आहे, जी 405 किलोमीटर बूट स्पेससह येते.