22 लाखात मिळेल ट्रॅक्टरपेक्षा जबरदस्त कार! शेतातही चालेल आणि रस्त्यावरही उडेल

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यंदा अनेक नवीन आणि भन्नाट वाहने सादर करण्यात आली. एआय बाईकपासून एअर टॅक्सीपर्यंत आणि सीएनजी स्कूटरपासून आलिशान कारपर्यंत अनेक पर्याय पाहायला मिळाले.

Ratnakar Ashok Patil
Published:

A-Thon Ashwa:- भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यंदा अनेक नवीन आणि भन्नाट वाहने सादर करण्यात आली. एआय बाईकपासून एअर टॅक्सीपर्यंत आणि सीएनजी स्कूटरपासून आलिशान कारपर्यंत अनेक पर्याय पाहायला मिळाले.

मात्र यामधील एक वाहन विशेष लक्षवेधी ठरले. ए-थॉन (Athon) या भारतीय कंपनीने आपल्या जबरदस्त ऑफ-रोड वाहनाचे अनावरण केले जे केवळ रस्त्यावरच नव्हे तर शेतात आणि डोंगराळ भागातही सहज चालवता येते.

Ashva शेती आणि रोडसाठी खास डिझाइन

ए-थॉन अश्व (Ashva) हे वाहन विशेषतः शेतीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे – 4X4 आणि 6X4. दमदार पॉवर आणि उत्कृष्ट ग्रिपमुळे हे वाहन कोणत्याही कठीण मार्गावर सहजपणे धावू शकते.

शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फीचर्स

या गाडीत फोर-स्ट्रोक V-Twin लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे प्रचंड ताकद निर्माण करते. गाडीला CVT ऑटोमॅटिक गीअरबॉक्स दिला गेला आहे, त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर स्मूथ राइडिंगचा अनुभव मिळतो.

शेतीसाठी ट्रॅक्टरसारखा उपयोग

या गाडीचा वापर चहा आणि कॉफीच्या बागांमध्ये तसेच शेतांमध्ये केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, यामध्ये ट्रॅक्टरप्रमाणे वेगवेगळी शेतीसाठी उपयुक्त टूल्स जोडण्याचा पर्याय दिला जातो, ज्यामुळे विविध शेतीकामे करता येतात.

डिस्क ब्रेक आणि स्टायलिश लूक

गाडीच्या समोर आणि मागे डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ती खूप मजबूत आहे. तसेच, अलॉय व्हील्स आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यामुळे गाडीला आधुनिक आणि आकर्षक लूक मिळतो.

किंमत आणि कस्टमायझेशनचा पर्याय

ही दमदार ऑफ-रोड गाडी ₹22 लाखांपासून सुरू होते. तसेच, कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमायझेशनचा पर्याय देते, म्हणजेच आवश्यकतेनुसार गाडीमध्ये बदल करता येऊ शकतात.

अधिक माहिती आणि खरेदीसाठी

ही अनोखी कार खरेदी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही Athon Alterion च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe