सध्याच्या परिस्थितीत जर बघितले तर आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जात असून अनेक वाहन उत्पादक कंपन्या कार तसेच बाईक व स्कूटर इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये आणताना आपल्याला दिसून येत आहेत. कारण सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याकारणाने सरकारच्या माध्यमातून देखील अशा वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
जवळपास भारतातील सगळ्या प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. परंतु बजाज ऑटोने मात्र याही पुढे जात चक्क जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करण्याची तयारी केली असून जुलै महिन्यामध्ये ही बाईक बजाज ऑटोच्या माध्यमातून लॉन्च केली जाणार आहे.
विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून याबाबतची अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. याबाबत कंपनीच्या माध्यमातून या बाईकच्या संदर्भात आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे व त्यामध्ये लॉन्चची तारीख देखील देण्यात आलेली आहे.
पाच जुलै रोजी होणार ही बाईक लॉन्च
बजाजची जगातील पहिली सीएनजी बाईक ही 5 जुलै रोजी लॉन्च केली जाणार आहे व या लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला बजाजचे एमडी राजीव बजाज आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. बजाज कंपनीने आपली पहिली सीएनजी बाईक अधिक उत्तम पद्धतीने डिझाईन केली असल्याची माहिती देखील बजाज कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
म्हणजे बजाजच्या या सीएनजी बाईकच्या लॉन्चिंगच्या आधी तिची टेस्टिंग करण्यात आली व ग्राहकांच्या हातात देण्यापूर्वी या बाईकची सर्व परिस्थिती समजून घेण्यासाठी तिची टेस्ट घेतली जाणार आहे. या टेस्टमध्ये जर काही दोष आढळून आले तर ते दुरुस्त केले जाऊ शकतील.
काय आहेत बजाजच्या या सीएनजी बाईकचे वैशिष्ट्ये?
या बाईकमध्ये वर्तुळाकार एलईडी हेडलाईट देण्यात आलेले आहेत व लहान साईड व्ह्यू मिरर, झाकलेली सीएनजी टॅंक तसेच लांब सिंगल सीट, हॅन्ड गार्ड, अलॉए व्हिल तसेच फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल स्पीडोमीटर यासारखे वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे.
तसेच बजाज कंपनीच्या माध्यमातून या एन्ट्री लेवल बाईक मध्ये सीएनजी टेक्नॉलॉजी आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचे मायलेज शंभर किलोमीटर प्रतिकिलो पर्यंत असू शकते. परंतु याबाबतची योग्य माहिती या बाईकच्या लॉन्चिंगच्या वेळेस मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लॉन्चिंग पूर्वी या बाईकच्या डिझाईनची माहिती झाली लीक
बजाजच्या या सीएनजी बाईकचे डिझाईन ची माहिती ती लॉन्च होण्याअगोदरच लिक झाली असून त्यानुसार बघितले तर या बाईकची चेसीस तसेच सीएनजी आणि पेट्रोल टाकीची माहिती समोर आलेली आहे. या बाईकमध्ये सीएनजी सिलेंडर सीटच्या खाली ठेवता येतो तर सीएनजी भरण्यासाठी पुढील बाजूस नोझल येते व विशेष म्हणजे यासोबत एक छोटी पेट्रोलची टाकी देखील देण्यात येणार आहे.