Bajaj Pulsar Bike: बजाजने डॅशिंग लुक असलेल्या 2 नवीन पल्सर भारतामध्ये केल्या लॉन्च! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Pulsar Bike:- भारतामध्ये अनेक पावरफूल आणि वेगवेगळ्या फीचर्स असलेल्या दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांचे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक अग्रेसर असे नाव आहे. यामध्ये हिरो मोटोकॉर्प, बजाज तसेच होंडा या कंपन्या संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत.

आजपर्यंत या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्य असलेल्या आकर्षक किमतीमध्ये बाईक्स सादर करण्यात आलेल्या असून सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा बाईक निर्मितीमध्ये देखील या कंपन्या नेहमीच पुढे राहिलेल्या आहेत. या माध्यमातून जर आपण बजाज कंपनीचा विचार केला तर ही देखील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे.

आजपर्यंत या कंपनीने अनेक परवडण्याजोगे किमतींमध्ये बाईक सादर केलेले आहेत व अनेक डॅशिंग लूक असलेल्या व स्पोर्टी लुक असलेल्या बाईक देखील बजाजने मार्केटमध्ये आणलेले आहेत.

बजाज कंपनीची जर आपण पल्सर सिरीजचा विचार केला तर तरुणाई पासून तर शेतकऱ्यांपर्यंत पल्सर ही खूप प्रसिद्ध अशी बाईक आहे. याच महत्त्वाच्या असलेल्या पल्सर सिरीजमध्ये आता बजाजने पल्सर N160 आणि N150 ही दोन मॉडेल लॉन्च केली आहेत. याच दोन्ही मॉडेल बद्दलची माहिती आणि किंमत आपण जाणून घेऊ.

 बजाजने लॉन्च केली पल्सर एन 160 आणि एन 150

बजाज कंपनीने नुकतीच पल्सर एन 160 आणि एन 150 हे दोन मॉडेल लॉन्च केले असून त्यामध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आलेली आहेत. यामध्ये पल्सर एन 160 ही काळा, लाल आणि निळ्या रंगांमध्ये देण्यात आलेली असून पल्सर एन 150 काळ्या आणि सफेद रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या दोन्ही बाइकमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट एलसीडी क्लस्टप  व नवीन क्लस्टर डेडिकेटेड बजाज राईडसह कनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील सपोर्ट करते. या नव्या पल्सरमध्ये डाव्या स्विच गिअरसह एक नवीन बटन देखील देण्यात आले आहे.

या दोन्ही बाइक मध्ये देण्यात आलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी बाईक रायडर्सला कनेक्ट करते व यामुळे कॉल घेणे किंवा फोन कॉल कट करणे, मोबाईलचे नोटिफिकेशन अलर्ट किंवा बॅटरी लेवल याची माहिती रायडर्सला मिळण्यास मदत होते. तसेच गिअर पोझिशन इंडिकेटर, इन्स्टंट फ्युएल इकॉनोमी आणि अवरेज इकॉनोमी फीचर देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत.

तसेच बॉडी पॅनल, इंधन टॅंक आणि हेडलॅम्प असेंबली देण्यात आली आहे. इंजिनचा विचार केला तर पल्सर एन 160 मध्ये 164.82cc  DTS-i देण्यात आलेले असून जे 15.8 बीएचपी पावर आणि 14.65 एनएम टॉर्क जनरेट करते. बजाज पल्सर एन 160 ही 45Km/l मायलेज देऊ शकते तर पल्सर एन 150 मध्ये 149.68 सीसी इंजिन देण्यात आलेली असून ते 14.3 बीएचपी पावर आणि 13.5 एनएम टॉर्क जनरेट करते.

 किती आहे या दोन्ही मॉडेलची किंमत?

जर आपण बजाजने सादर केलेल्या पल्सर सिरीज मधील या दोन्ही मॉडेलची किंमत पाहिली तर पल्सर एन 160 बाईकची किंमत एक लाख तीस हजार पाचशे साठ रुपये तर पल्सर एन 150 या बाईकची किंमत एक लाख 17 हजार 677 रुपये इतकी आहे.