Bike Mileage Tips: ‘या’ गोष्टी करा आणि तुमच्या बाईकचे मायलेज सुधारा! वाचेल मोठ्या प्रमाणावर पैसा

Ajay Patil
Published:
bike mileage tips

Bike Mileage Tips:- आजकालच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जण मोटरसायकलचा वापर प्रवासासाठी करत असतात. जवळपास आता प्रत्येक घराच्या समोर आपल्याला बाईक दिसून येते. परंतु जेव्हाही बाईक खरेदी करण्यासाठी प्लॅनिंग केली जाते तेव्हा सगळ्यात अगोदर त्या बाईकची किंमत आणि त्या बाईकपासून मिळणारे मायलेज याचा विचार प्रामुख्याने केला जातो.

कारण बाईकच्या मायलेजचा थेट संबंध हा पैशांशी असल्यामुळे बाईकचे मायलेज उत्तम असणे खूप गरजेचे असते. तसेच बऱ्याचदा आपण जी काही बाईक वापरतो तिचे मायलेज कमी होते व अगदी कमीत कमी अंतरासाठी देखील जास्त पेट्रोलचा वापर बाईकच्या माध्यमातून केला जातो

व आपल्याला त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जर हीच बाब तुमच्या बाईकच्या संबंधी घडत असेल तर बाईकचे मायलेज सुधारण्यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याविषयीची माहिती या लेखात घेऊ.

 या गोष्टी करा आणि बाईकचे मायलेज सुधारा

1- बाईकचे कार्बोरेटर रिट्यून करा जर तुम्हाला तुमच्या मोटरसायकल पासून जास्तीत जास्त मायलेज मिळत नसेल तर कार्बोरेटर सेटिंग तपासणे गरजेचे आहे. म्हणजेच मोटरसायकलचे कार्बोरेटर रिट्यूनिंग करणे गरजेचे आहे. मोटरसायकलचे कार्बोरेटर हे इलेक्ट्रिकली किंवा मॅन्युअली रिट्यून केले जाऊ शकते. असे केल्यामुळे मोटरसायकलच्या इंजिनची कार्यक्षमता वाढते व मायलेज मध्ये देखील चांगली सुधारणा होते.

2- ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन बंद ठेवणे बऱ्याचदा आपण जेव्हा शहरी भागामध्ये प्रवास करत असतो तेव्हा ट्रॅफिक सिग्नल वर काही वेळ थांबावे लागते. अशावेळी जर तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल वर वीस सेकंदापेक्षा जास्त कालावधी करिता थांबावे लागत असेल तर मोटरसायकल बंद करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला किंवा ट्रॅफिक सिग्नल वर थांबावे लागत असेल तर त्या ठिकाणी गाडीचे इंजिन बंद केले तर भरपूर इंधन तुम्ही वाचवू शकता.

3- टायरचा प्रेशर तपासणे बऱ्याचदा वाहनाची इंधन कार्यक्षमता किंवा मायलेज हा टायरच्या दाबावर देखील अवलंबून असतो. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या लांबच्या प्रवासात मोटरसायकल घेऊन जात असाल तर त्या अगोदर टायरचा प्रेशर तपासून घेणे गरजेचे आहे व त्याची नियमितपणे देखभाल करणे आवश्यक आहे.

4- मोटरसायकलची स्वच्छता तुम्ही तुमची मोटरसायकल नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ स्थितीमध्ये ठेवणे गरजेचे आहे व या माध्यमातून देखील तुम्हाला उत्तम असे मायलेज मिळवता येते. त्यामुळे मोटरसायकलला वेळोवेळी धुवून तिला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच बेरिंग सारख्या हलणाऱ्या भागांमध्ये ग्रिसिंग( वंगण ) करणे गरजेचे आहे.

5- मोटरसायकल मधील अनावश्यक बदल बऱ्याचदा आपण आहे त्या मोटरसायकल मध्ये अनेक बदल करतो किंवा डिझाईन करतो. जर तुम्ही अशा पद्धतीने अनावश्यक अपडेट्स आणि बदल जर मोटरसायकलमध्ये केले तर त्याचा थेट परिणाम इंजिनवर होतो व त्यामुळे बाईकची इंधन कार्यक्षमता कमी होऊन मायलेज कमी होते. त्यामुळे अशा पद्धतीने मोटरसायकल मधील अनावश्यक अपडेट आणि बदल करणे टाळावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe