Bike News: हिरोची ‘ही’ धमाकेदार बाईक या तारखेला होणार लॉंच! वाचा या बाईकचे वैशिष्ट्य आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bike News:- भारतामध्ये अनेक प्रसिद्ध आणि आघाडीच्या अशा टू व्हीलर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून प्रामुख्याने आपल्याला होंडा, बजाज, सुझुकी तसे यामाहा सारख्या कंपन्यांची नावे घेता येतील. या कंपन्यांच्या यादीमध्येच हिरो मोटोकॉर्प ही देखील खूप मोठी आघाडीची कंपनी असून संपूर्ण देशामध्ये दुचाकी निर्मितीमध्ये ही कंपनी प्रसिद्ध आहे.

आजपर्यंत आपण हिरो मोटोकार्पचा इतिहास पाहिला तर अनेक प्रसिद्ध असे दुचाकी मॉडेल या कंपनीने बाजारपेठेत आणलेले आहेत. त्यासोबतच आता ही कंपनी येत्या 22 तारखेला म्हणजेच 22 जानेवारी रोजी  Marverick 440 बाइक लॉंच करण्याची तयारीत आहे. याच बाईकची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 हिरो मोटोकॉर्प लॉन्च करणार Marverick 440 बाईक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील प्रसिद्ध टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प येत्या 22 जानेवारी रोजी  Marverick 440 ही बाईक लॉन्च करणार असून या वर्षातले पहिले लॉन्चिंग कंपनीचे असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बाईकचे वैशिष्ट्य असे आहे की ती हिरो मोटोकोर्पच्या लाईन अपमध्ये सर्वात महागडी दुचाकी असणार आहे.

त्या गाडीचे वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये 440cc सिंगल सिलेंडर, ऑइल/ एअर कुल्ड इंजिन असणार असून जे 6000rpm वर 27bhp पावर आणि 4000rpm वर 38Nm टॉर्क निर्माण करणार आहे. तसेच हिरोच्या करिज्मा X MAG चे काही फीचर्स या बाईक मध्ये असतील अशा अपेक्षा आहे.

जर या बाईकचे इतर फीचर्स पाहिले तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टीएफटी स्क्रीन, टर्न बाय टर्न नेवीगेशन सारखे वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. तसेच एप्पल व अँड्रॉइड सारख्या उपकरणांशी सुसंगत ॲपच्या माध्यमातून स्मार्टफोन इंटिग्रेशन देखील असणार आहे. या बाईकला समोर राऊंड हेडलॅम्प, मस्क्युलर फ्युएल टॅंक आणि बार एंड मिरर असण्याची देखील शक्यता आहे.

किती असेल या बाईकची किंमत?

मिळालेल्या माहितीनुसार Marverick 440 ची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असण्याची शक्यता आहे. म्हणजेच हार्ले डेविडसन X440 पेक्षा कमीत कमी किमतीत ही बाईक बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.