Maruti Suzuki Dezire LXI:- मारुती सुझुकी ही कार उत्पादक कंपनी भारतामध्ये प्रसिद्ध असून या कंपनीच्या अनेक कार मॉडेल्स अगदी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत प्रसिद्ध आहेत. अत्यंत परवडणाऱ्या किमतींमध्ये मारुती सुझुकीने बाजारामध्ये कार उपलब्ध करून दिले असून अनेक सेगमेंटमध्ये उत्तम अशा कार ऑफर केलेले आहेत.
त्यातील जर आपण एक कार बघितली तर ती म्हणजे मारुती सुझुकी डिजायर ही कार होय. मारुतीची डिजायर ही कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंट मधील एक महत्त्वाची कार असून तुम्हाला जर या कारचे बेस व्हेरियंट LXI घरी आणायचा विचारा असेल तर तुम्ही दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून खरेदी करू शकतात.
जर तुम्ही दोन लाख रुपयाचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला किती रुपयांचा महिन्याला हप्ता भरावा लागेल व किती लोन यावर मंजूर होईल? याबाबतची माहिती बघू.
किती आहे मारुती डिझायर LXI ची किंमत?
मारुती डिझायरचे बेस व्हेरियंट म्हणून LXI ऑफर केले असून कंपनीने या सेडान कारचे बेस व्हेरियंट सहा लाख 56 हजार रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.
जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली असेल तर कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 39 हजार रुपयांपर्यंत जाते. यावर तुम्हाला नोंदणी कर आणि आरटीओ टॅक्स देखील भरावा लागेल.
आरटीओसाठी साधारणपणे 45 हजार 955 रुपये आणि विम्याचे 36 हजार 915 रुपये तुम्हाला द्यावे लागतील.हा सगळा खर्च मिळून दिल्लीत या कारची ऑन रोड किंमत सात लाख 39 हजार 370 रुपये होते.
बँक किती देईल लोन?
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी पाच लाख 39 हजार 370 रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला 8678 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
अशा स्थितीत सात वर्षात तुम्हाला मारुती डिझायरच्या LXI व्हेरियंट करिता सुमारे एक लाख 89 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स शोरूम किंमत ऑनरोड आणि व्याजासह एकूण सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये इतकी होते.