Budget Car In India:- घरापुढे स्वतःची कार असावी हे कित्येकांचे स्वप्न असते व हे स्वप्न गर्भ श्रीमंत असलेल्या लोकांचेच असते असे नव्हे तर अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींचे देखील असते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या अव्वाच्या सव्वा असल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला कार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये चांगले वैशिष्ट्ये असणाऱ्या कारच्या शोधात आपल्याला अनेक जण दिसून येतात.कारण कोणतीही व्यक्ती जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा ती कारची किंमत, तिच्यात असलेली वैशिष्ट्ये व मायलेज इतर गोष्टींचा प्रामुख्याने विचार करत असतो व यामध्ये आर्थिक बजेट खूप महत्त्वाचा ठरत असतो.
म्हणून आपण या लेखांमध्ये अशा काही कारची माहिती घेणार आहोत की ज्या कमी बजेटमध्ये देखील मिळतात व त्यामध्ये चांगले सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले असून ज्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी फायद्याच्या ठरतील.
मध्यमवर्गीयांना आर्थिक दृष्टिकोनातून परवडतील अशा बजेट फ्रेंडली कार
1- ह्युंदाई वेन्यू– ही कार अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असून या कारमध्ये ADAS सोबत अनेक सुरक्षितता वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. ह्युंदाई कंपनीने या कारमध्ये लेव्हल-1 ADAS दिले असून हे फीचर कारच्या sx(o) व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे. जर आपण ह्युंदाई वेन्यू कारची किंमत पाहिली तर ती बारा लाख 44 हजार रुपये आहे.
2- किया सोनेट– या कंपनीने देखील अनेक कार भारतामध्ये लॉन्च केलेल्या असून यामध्ये किया कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली आहे. किया कंपनीच्या या एसयूव्ही कारमध्ये लेव्हल-1 ADAS देण्यात आलेले असून हे फिचर कीयाच्या GTX+ आणि x-Line प्रकारामध्ये देण्यात आले आहे व या कारमध्ये महत्त्वाचे म्हणजे दहा सुरक्षितता वैशिष्ट्ये म्हणजेच सेफ्टी फीचर्स देण्यात आले असून या कारची किंमत 14 लाख 55 हजार रुपये इतकी आहे.
3- महिंद्रा XUV 3XO- आपल्याला माहित आहे की महिंद्रा कंपनीने नुकतीच भारतीय बाजारामध्ये ही कार लॉन्च केले असून यामध्ये देखील ADAS फिचर देण्यात आले असून महिंद्रा कंपनीने या कार मध्ये लेव्हल-1 ADAS फीचर प्रदान केलेले आहे व या कारची किंमत 13 लाख 49 हजार रुपये आहे.
4- होंडा सिटी– ही एक सेडान कार असून कंपनीने या कारमध्ये देखील ADAS हे सेफ्टी फिचर दिले आहे व यामध्ये अनेक प्रकारची इतर सेफ्टी फीचर्स देखील आहेत. हे सेफ्टी फिचर या कारच्या V, VX आणि ZX या व्हेरीयंटमध्ये देण्यात आले असून ही कार 12 लाख 85 हजार रुपयांना खरेदी करता येऊ शकते.