Budget Car: किती दिवस बाईकवर फिरणार? 5 हजार रुपये महिन्याचा ईएमआय भरा व घ्या ‘ही’ कार, देते 33 किमीचे मायलेज

Ajay Patil
Published:
alto k10 car

Budget Car:- आजची तरुणाई आणि प्रत्येक व्यक्ती यांचे दोन महत्त्वाचे स्वप्न असतात ते म्हणजे एक स्वतःचे स्वप्नातील घर व त्या घरासमोर स्वतःची चारचाकी असणे हे होय. परंतु या दोन्ही गोष्टी जर आर्थिक दृष्टिकोनातून बघितल्या तर प्रत्येकाला शक्य होतील अशा नाहीत.

कारण घरांच्या किमती देखील प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर घेणे किंवा बांधणे शक्य नसते व त्यासोबतच कारच्या किमती देखील आठ ते दहा लाखांच्या पुढे असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःची कार घेणे शक्य होत नाही व यामुळे बऱ्याच जणांचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

परंतु तरीदेखील बरेच व्यक्ती हे कार घेण्याच्या बाबतीत आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतात व यामध्ये आपला जो बजेट आहे त्या बजेटमध्ये उत्कृष्ट प्रकारची कार आपल्याला मिळेल याच्या शोधात बरेच जण असतात.

त्यामुळे आपण या लेखामध्ये अशी एक कार पाहणार आहोत जिची किंमत पाच लाख रुपये पेक्षा कमी असून तुम्ही अगदी तुमच्या बजेट मधील ईएमआय भरून ती खरेदी करू शकता व तुमचे कारचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात.

 मारुती सुझुकी अल्टो K10 ही कार करेन तुमचे स्वप्न पूर्ण

आता मारुती सुझुकीची अल्टो K10 हे कार प्रत्येकालाच माहिती आहे व या कारची किंमत देखील पाच लाखापेक्षा कमी आहे हे आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही मारुती सुझुकी अल्टो  k10 कार खरेदी करायचे ठरवले तर या कारच्या बेस मॉडेलची ऍव्हरेज ऑन रोड किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असून यामध्ये आवश्यक असलेले सर्व फीचर्स तुम्हाला या कारमध्ये मिळतात.

साधी आपण बाईक घ्यायचे ठरवले तरी देखील तिच्या किमती या 70 ते 80 हजारापासून तर काही लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यामध्ये बाईक घेण्यापेक्षा तुम्हाला जर कार घ्यायचे असेल तर तुम्ही ही कार घेऊ शकतात. ही कार घेण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट करणे आवश्यक राहील व या कारसाठी तुम्ही जर एक लाख 35 हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर बाकीचे लोन घेऊन हे कार घेऊ शकतात.

सध्या नऊ टक्के व्याजदराने या कारसाठी  लोन उपलब्ध करून दिले जाते व याचा ईएमआय 5000 रुपयांच्या आसपास आपल्याला भरावा लागतो. एखादी बाईक घेतली तरी देखील आपल्याला पाच हजार रुपयापर्यंत ईएमआय भरावा लागतो.

त्यामुळे तुम्ही हा ईएमआय अगदी आरामात पेड करू शकतात व तुमचे कारचे स्वप्न पूर्ण करू शकता. सध्या मारुती सुझुकीची अल्टो k10 ही कार चार व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असून त्यातील Vxi मॉडेल सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील आहे व याच्या टॉप मॉडेलची किंमत साधारणपणे सहा लाख 61 हजार पर्यंत जाते.

 कसे आहे या कारचे इंजिन?

या कारमध्ये कंपनीच्या माध्यमातून 1.0 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व हे इंजिन 66 बीएचपीची पावर आणि 89 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल युनिट किंवा एएमटी गिअरबॉक्स ऑप्शन्ससह येते. या इंजिन सोबत ही कार 24 ते 33 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. तसेच ही कार बाजारामध्ये  Std, Lxi, Vxi आणि Vxi+ या चार वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe