Car Loan: तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल तर ‘या’ बँकांकडून मिळेल स्वस्तात लोन! वाचा बँकांचे व्याजदर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Loan:- स्वतःची कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण प्रयत्न करत असते. वाहन कर्जामध्ये कार खरेदी करण्यासाठी देखील आपल्याला विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज सुविधा मिळते. त्यामुळे कार लोनच्या माध्यमातून बरेच जण स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करतात. कधी कधी अनेक एसयुव्ही खरेदीला देखील ग्राहक पसंती देतात. त्यामुळे नक्कीच जास्त प्रमाणात पैसा लागतो.

हा पैसा जमवाजमव करताना आपण कार लोनचा पर्याय निवडतो. त्यासाठी आपण कोणत्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी व्याजदराने कर्ज मिळेल याच्या शोधात असतो. कारण व्याजदराचा फार मोठा परिणाम हा तुमच्या घेतलेल्या कर्ज परतफेडीवर होत असल्यामुळे व्याजदर पाहूनच कर्ज घेणे हे फायद्याचे ठरते. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण कोणती बँक किती व्याज दरात कार लोन उपलब्ध करून देते त्याबद्दलची माहिती बघू.

 या बँका देतात स्वस्तात वाहन कर्ज

1- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वाहन कर्ज घेतले तर ते 8.65 ते 9.75 टक्के इतके व्याजदराने मिळते. समजा तुम्ही जर पाच लाख रुपये कर्ज पाच वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला साधारणपणे 10562 रुपये इतका ईएमआय येऊ शकतो.

2- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँक देखील वाहन खरेदी करिता कर्ज देते व या बँकेकडून वाहन कर्ज 8.95% व्याजदरापासून पुढे मिळते. परंतु बँकेच्या माध्यमातून प्रक्रिया शुल्क हे 999 ते 8500 कर्जाच्या रकमेनुसार ते लागू होते.

3- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेकडून जर तुम्हाला वाहन कर्ज घ्यायचे असेल तर बँकेकडून यावर 8.75% पासून पुढे व्याजदर आकारला जातो. यामध्ये एकूण कर्ज रकमेच्या 0.50% पर्यंत प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाते. हे शुल्क आठ हजार रुपयांपर्यंत असू शकते.

4- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेकडून देखील वाहन कर्ज मिळते व या बँकेकडून मिळणारे वाहन कर्जावर 8.75 ते 9.60% पर्यंत व्याजदर आकारला जातो. तसेच प्रक्रिया शुल्काचा विचार केला तर एकूण कर्ज रक्कमेच्या 0.25 टक्क्यांपर्यंत ते आकारले जाते.

5- कॅनरा बँक कॅनरा बँकेच्या माध्यमातून देखील तुम्ही वाहन कर्ज घेऊ शकतात व या वाहन कर्जावर बँकेच्या माध्यमातून 8.80 ते 11.95% पर्यंत व्याजदर आकारला जातो. विशेष म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कॅनरा बँकेने वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्कावर सूट दिलेली आहे.

 बँकांकडून किती मिळू शकते कर्ज?

बँकाच्या माध्यमातून कार खरेदीसाठी तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 90% किमतीपर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु याकरिता कर्जदाराची पात्रता तसेच त्याचे उत्पन्न व त्याचे कर्ज फेडण्याची क्षमता यावर किती कर्ज मिळेल हे प्रामुख्याने ठरत असते. समजा तुमच्या क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज मिळेल व चांगला क्रेडिट स्कोर असेल तर कमी व्याजदराने कर्ज मिळते.