Car Update: ‘या’ ठिकाणी कार मिळेल एक लाखात तर दुचाकी व स्कुटी मिळेल 15 हजारात! कसे ते वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Update:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःची कार घेण्याची इच्छा असते.तसेच दुचाकी आणि इतर वाहनांची बऱ्याच जणांना खरेदी करण्याच्या इच्छा असते. परंतु कारचा जर विचार केला तर किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण जुन्या गाड्या खरेदी करण्याकडे वळतात.

जर आपण जुन्या गाड्या खरेदी करण्याचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन्ही प्रकारचे पर्याय मिळतात. कारण भारताचा विचार केला तर जुन्या कार किंवा जुन्या वाहनांची विक्रीचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून अनेक मोठ्या प्रमाणावर पर्याय देखील  ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

ऑनलाइन पद्धतीने जरी वाहनांची विक्री किंवा खरेदी केली तरी त्यावर वारंटी आणि रजिस्ट्रेशन योग्यरीत्या तपासले जाऊनच व्यवहार पूर्ण केला जातो. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा विचार केला तर यामध्ये कारवाले आणि ओएलएक्स, कार देखो यासारखे ब्रँड बाजारपेठेमध्ये खूप विकसित झाले आहेत. याशिवाय बँकेच्या माध्यमातून ज्या काही वाहनांचा लिलाव केला जातो त्या माध्यमातून देखील अशा कार खरेदी करण्याचे सुवर्णसंधी निर्माण होते. नेमके बँकेच्या माध्यमातून लिलावातून कार कशी खरेदी करावी व त्याचे फायदे काय मिळतात याविषयी माहिती घेऊ.

 बँकेच्या लिलावातून अशा पद्धतीने खरेदी करावी कार

बऱ्याचदा अनेक जण बँकेकडून कर्ज घेऊन कार किंवा दुचाकी घेतात. परंतु काही कारणास्तव घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य होते व त्यामुळे अशा ग्राहकांकडून  बँका कार किंवा दुचाक्या जप्त करतात. अशा जप्त केलेल्या वाहनांची विक्री करून बँक त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात व  त्यासाठी लिलाव आयोजित केला जातो.

अशा लिलावाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक महाग असे वाहने कमी किमतींमध्ये मिळणे शक्य आहे व तुम्हाला या माध्यमातून खूप मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. लिलावाच्या माध्यमातून कार खरेदी केली तर कमीत कमी किमतीत चांगली कार तुम्हाला मिळते परंतु याशिवाय नोंदणी व इतर कागदपत्रांबाबत तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही. बँकांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे कागदपत्रे ग्राहकाला किंवा खरेदीदाराला पुरवली जातात.

 बँकेच्या माध्यमातून कार किंवा इतर प्रॉपर्टी कशी खरेदी करावी?

जर बँकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या लिलावाच्या माध्यमातून तुम्हाला कार किंवा इतर मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला बँकेची संपर्क ठेवणे गरजेचे आहे. तसेच ई लिलाव आणि आयबीए यासारखे ऑक्शन प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकल्या जातात. अशा स्थितीमध्ये तुम्ही कार किंवा इतर मालमत्ता खरेदीसाठी बोली लावू शकतात.