केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये नुकतीच अनावरण झालेली जिल्ह्यातील पहिली ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर हे वाहन मा.आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते पहिले ग्राहक सत्यम गुंदेचा यांना देण्यात आले. यावेळी श्रेयस पितळे, निर्मल मुथा, भुपेंद्र परदेशी, कुनाल गुगळे, शोरुमचे संचालक जनक आहुजा, अनिश आहुजा आदी उपस्थित होते.
अरुणकाका जगताप म्हणाले की, टोयोटा किर्लोस्कर कंपनीने ग्राहकांची गरज व आवड ओळखून दर्जेदार वाहन बाजारपेठेत आनले आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन कारची बनावट असून, न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर आकर्षक लुकमध्ये विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार ग्राहकांसाठी पर्वणी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी करुन या नवीन वाहनाची माहिती दिली.
एसयुव्ही श्रेणीतील ग्राहकांचा कल ओळखून ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर लॉन्च करण्यात आली आहे. बाजारपेठेत ही नवीन कार दाखल करुन कंपनीने एसयूव्ही सेगमेंट मध्ये पुन्हा प्रवेश झाल्याचे चिन्हांकित करून ग्राहकांना आधुनिक शैली, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रतिष्ठेची भावना प्रदान केली आहे.
ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो, 1.2 लिटर पेट्रोल आणि ई सीएनजी पर्यायमध्ये उपलब्ध आहे. 1.0 लिटर टर्बो 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो पर्यायामध्ये 100.06 पीएस 5500 आरपीएम ची कमाल पॉवर वितरित करते.
मॅन्युअल साठी 21.5 किलोमीटर प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक साठी 22.0 किलोमीटर प्रति लिटर या श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसह पावर पॅक्ड ड्रायव्हिंग अनुभव देते. 1.2 लिटर पेट्रोल इंजन 21.7 मॅन्युअल आणि 22.8 (एमटी) प्रति किलोमीटरच्या इंधन कार्यक्षमतेसह एकूण 89.73 पीएस 6000 आरपीएम ची कमाल पावर देते. तसेच 28.5 प्रति केजी किलोमीटरची इंधन कार्यक्षमता ऑफर करणाऱ्या ई सीएनजी पर्यायमध्ये देखील उपलब्ध असल्याचे शोरुमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आ