Discount On Electric Scooter: ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मिळत आहे 20 हजार रुपयांचा डिस्काउंट! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Discount On Electric Scooter:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक वळताना दिसून येत असून अनेक इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी व त्यासोबतच इलेक्ट्रिक स्कूटरकडे ग्राहकांचा कल आता दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर  इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ आता दिसून येत आहे.

जर आपण इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनीचा विचार केला तर अनेक कंपन्या भारतात असून त्यांनी अनेक नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनीचा विचार केला तर यामध्ये एथर ही कंपनी खूप महत्त्वाची असून या कंपनीने नवीन वर्षामध्ये ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून या कंपनीच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक स्कूटर वर खूप मोठ्या प्रमाणावर सवलत देण्यात येत आहे. याच संबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 एथर नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर देत आहे वीस हजार रुपयांचा डिस्काउंट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी एथरने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 450S च्या किमतीमध्ये मोठी कपात केली असून या कंपनीने तब्बल किमतीत 20000 हजार रुपयांची सवलत म्हणजेच डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ओला इलेक्ट्रिकला कडवी टक्कर देण्याकरिता ही ऑफर लॉन्च केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने 450S इलेक्ट्रिक स्कूटरच्या एक्स शोरूम किमतीवर 20 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्याची घोषणा केली असून त्यामुळे आता या स्कूटरची किंमत कमी होऊन 1 लाख 9999 पर्यंत आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ऑफरची माहिती स्वतः एथर एनर्जीचे सीईओ तरुण गर्ग यांनी दिली आहे.

 एथर 450S इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.9 Kw सिंगल लिथियम लिटनियम आयन बॅटरी देण्यात आली असून ही फुल चार्ज केल्यावर 115 किलोमीटरची रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड हा 90 किलोमीटर प्रति तास इतका असून ती केवळ 3.9 सेकंदामध्ये 40 किलोमीटर प्रति तासचा वेग पकडते.

तसेच या स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्ले असून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सारखे अनेक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल,

डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, फोन चार्जिंग करण्याकरता चार्जिंग पोर्ट आणि राईड मोड सारखे अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्म इंडिकेटर आणि लो बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर देण्यात आले आहेत.