EICHER 330 Tractor:- शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिक काढणीपर्यंतची बरीच कामे ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. कारण शेती कामासाठी जी यंत्र विकसित करण्यात आलेली आहे त्यातील बरीच यंत्रे ही ट्रॅक्टर चलीत असल्याने ट्रॅक्टर चे महत्व आणखीनच वाढते.
त्यामुळे शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तो मजबूत, चांगले मायलेज देणारे आणि कमी किमतीतले ट्रॅक्टर खरेदी करण्याचा प्रामुख्याने विचार करतो. सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत व त्यामधून ट्रॅक्टरची निवड करण्यामध्ये शेतकऱ्यांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो.
जर तुमच्याकडे कमी शेती असेल व तुम्हाला एखादा पावरफुल मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर उपलब्ध मिनी ट्रॅक्टरच्या पर्यायांपैकी आयशर 330 ट्रॅक्टर तुमच्यासाठी उत्तम ठरेल. कारण हे ट्रॅक्टर शेतीमध्ये दमदार कामगिरी सह मायलेज देखील चांगले देते.
काय आहेत आयसर 330 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
या ट्रॅक्टरमध्ये 2272 सीसी क्षमतेसह तीन सिलेंडर मध्ये सिम्पसन/ वॉटर कुल्ड इंजिन पाहायला मिळते. जे 35 एचपी पावर जनरेट करते. कंपनीच्या माध्यमातून या आयशर 330 ट्रॅक्टरमध्ये उत्तम प्रकारचे एअर फिल्टर देखील देण्यात आलेले आहेत. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 28.38 एचपीची असून सर्व प्रकारची कृषी अवजारे चालवण्यासाठी हे ट्रॅक्टर सक्षम आहे.
या ट्रॅक्टरचा कमाल प्रतितास वेग पाहिला तर तो 29.83 कीमी प्रतितास इतका आहे. तसेच या ट्रॅक्टरला 45 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे व याची हायड्रोलिक पावर 1450 किलो इतकी ठेवण्यात आली असून ती CAT-III थ्री पॉईंट लिंकेज सह ड्राफ्ट, पोझिशन आणि रिस्पॉन्स कंट्रोल लिंक्स सह येते. या मिनी ट्रॅक्टर चे वजन 1755 किलो आहे.
या ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टर मध्ये मेकॅनिकल स्टेरिंग देण्यात आलेले असून जी शेतामध्ये सुरळीतपणे ड्राईव्ह करण्यास मदत करते. हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गिअर्ससह गिअरबॉक्ससह येतो.
तसेच आईसर कंपनीचा हा ट्रॅक्टर सिंगल क्लचसह सेंटर शिफ्ट अंशीक स्थिर जाळी ट्रान्समिशनमध्ये येतो. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ऑइल एमरस्ड ब्रेक देण्यात आलेली आहे व टायरवर चांगली पकड ठेवण्यासाठी फायद्याचे आहेत. आईसर 330 ट्रॅक्टर टू व्हील ड्राईव्ह मध्ये येते.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
भारतामध्ये आयसर 330 ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत चार लाख 50 हजार ते चार लाख 80 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स मुळे काही राज्यांमध्ये बदलू शकते. कंपनीने या ट्रॅक्टर सह दोन वर्षांची वारंटी दिली आहे.