Electric Car: टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार बाजारात करणार धमाल! देण्यात आले आहेत ही आकर्षक फीचर्स, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Car:- टाटा मोटर्स म्हटले म्हणजे भारतातील वाहन निर्मिती उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेली कार ग्राहकांसाठी बाजारात सादर करण्यात आलेले आहेत. तसे पाहिले गेले तर भारतामध्ये सर्वसामान्य ग्राहकांपासून तर श्रीमंत ग्राहकांमध्ये टाटाच्या कार या लोकप्रिय आहेत.

बाजारपेठेतील मागणीनुसार कायम टाटा मोटर्सने अनेक बदल अंगीकारले आहेत. सध्याचा ट्रेंड जर आपण पाहिला तर आता इलेक्ट्रिक वाहन वापराकडे अनेक लोक वळताना दिसून येत असल्यामुळे या क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीकडे वळले आहेत.

याच अनुषंगाने आता टाटा मोटर्स देखील यामध्ये मागे राहिली नसून याच महिन्यात टाटा मोटर्स पंच ईव्ही लॉन्च करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये मिळणारे फीचर्स देखील हटके असणार आहेत. जर आपण टाटा पंच या इलेक्ट्रिक कारचा विचार केला तर या कारच्या पेट्रोल मॉडेलच्या तुलनेमध्ये अनेक आडवांस असे फिचर देण्यात आलेले आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीचा विचार केला तर कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असण्याची शक्यता आहे. नेमकी या कार मध्ये काय वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 टाटा पंच ईव्हीचे फीचर्स

1- प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प जर आपण टाटा पंचचे नियमित वर्जन पाहिले तर यामध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेड लॅम्प देण्यात आलेले आहेत. परंतु या पंच इलेक्ट्रिक कारमध्ये नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आलेले असून या टाटा पंच इलेक्ट्रिक कारची पुढची बाजू म्हणजेच फ्रंट बेस हा नेक्सन इलेक्ट्रिक कार सारखा मिळता जुळता आहे. यामध्ये बोनटची पूर्ण रुंदीसह एलईडी डीआरएल पट्टी लावण्यात आली आहे.

2- 10.25 इंचाचा आहे टच स्क्रीन इन्फोटेनमेंट– टाटाने या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये नवीन मोठा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिला असून तो अपडेटेड डॅशबोर्डचा एक भाग आहे. या नवीन टाटापंच इलेक्ट्रिक कारचा केबिन एक्सपिरीयन्स देखील चांगला असून यामध्ये आर्केड. ईव्ही फीचर्ससह देण्यात आलेले असून त्यामध्ये अनेक ॲप्स देखील मिळणार आहेत. याचा वापर ईव्ही चार्जिंग साठी प्लग इन करताना करता येऊ शकतो.

3- 6 एअरबॅग यूजर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर टाटा मोटर्सने या पंच इलेक्ट्रिक कार मध्ये स्टॅंडर्ड म्हणून सहा एअर बॅग दिले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक कार मध्ये स्टॅबिलिटी कंट्रोल, एबीएस आणि रियर पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स देखील मिळतील.

4- 360 डिग्री कॅमेरा टाटा मोटर्स या टाटा पंच इलेक्ट्रिक कार मध्ये 360 डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा सिस्टमसह सादर करणार आहे. म्हणजेच अगदी कमीत कमी जागेमध्ये देखील कार पार्किंग करण्यासाठी ड्रायव्हरला म्हणजे चालकाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे.

5- व्हेंटिलेटेड फ्रंट सीट टाटा मोटर्सच्या एन्ट्री लेवल इलेक्ट्रिक एसयूव्ही कार मध्ये ग्राहकांना व्हेंटिलेटेड फ्रंट सीटची सुविधा दिली आहे. जर या फिचरचा विचार केला तर हे अगोदर प्रीमियम आणि महागड्या गाड्यांमध्ये होते. परंतु टाटा ने आता त्यांच्या या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये हे फीचर्स दिले आहे. हे फिचर कारच्या टॉप व्हेरियंट पर्यंतच मर्यादित असतील.

6- एअर पुरिफायर टाटाची ही पंच ईव्ही बिल्ट इन एअर पुरिफायर सोबत येईल. त्याच्या सेंट्रल इन्फोटेनमेंट सिस्टम मध्ये लावण्यात आलेल्या डिस्प्ले सध्याची एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवेल. यामध्ये असलेला एअर पुरिफायर केबिन सोबतच आजूबाजूची हवेची गुणवत्ता ट्रॅक करण्याची सुविधा देईल.

7- वायरलेस फोन चार्जर या टाटाच्या पंच पेट्रोल मॉडेल मध्ये कंपनीच्या माध्यमातून वायरलेस फोन चार्जर दिलेले नाही. मात्र टाटा पंच इलेक्ट्रिक कार मध्ये हे प्रीमियम फिचर देण्यात येणार आहे.

 किती असू शकते या कारची किंमत?

मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स या टाटा पंच इलेक्ट्रिक कार बारा लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्याची शक्यता आहे.