Electric Scooter:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक बाइक्स सध्या खरेदी केल्या जात आहे.
वाढते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रामुख्याने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीने जर आपण इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी असलेल्या एथर या कंपनीचा विचार केला तर या कंपनीने मोठ्या कालावधीनंतर नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रिझटा(Rizta) लॉन्च केली असून ही एक नवीन फॅमिली ई-स्कूटर आहे.
Ather ने लॉन्च केली नवीन ई स्कूटर Rizta
Ather ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Rizta लॉन्च केली असून ही एक फॅमिली स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये पुरेशी जागा आणि आरामदायी वैशिष्ट्यांशी निगडित असलेल्या गोष्टींवर विशेष प्रकारे लक्ष दिले गेले आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरची एकूण स्टोरेज क्षमता 56 लिटरची असून यामध्ये फ्रॅंक आणि अंडरसीट स्टोरेजचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील पहिली अशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे की ज्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आला आहे.
या स्कूटरच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या स्पोर्टीयर 450 प्रमाणेच यामध्ये काही तपशिलासह ती आकर्षक असून प्रवास करण्यासाठी खूप सोपी आहे. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या इतर विभागातील स्कूटर पेक्षा सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटर च्या दोन्ही प्रकारांमध्ये 2.9kWh आणि मोठ्या 3.7kWh बॅटरी पॅकसह वेगवेगळ्या आकाराच्या दोन बॅटरी पॅक देण्यात आलेले आहेत. आपण यांची रेंज पाहिली तर 2.9kWh बॅटरी पॅक असलेल्या व्हेरियंटची रेंज १२३ किलोमीटर आहे तर 3.7kWh बॅटरी पॅक असलेल्या व्हेरिएंटाची रेंज 165 किलोमीटर आहे.
एवढेच नाही तर या दोन्ही प्रकारांचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर आहे. तसेच यामधील टॉप एंड व्हर्जनला TFT डिस्प्ले देण्यात आला असून दोन रायडिंग मोड्स,
रिव्हर्स फंक्शन देखील उपलब्ध आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ची डिलिव्हरी जुलैपासून सुरू होणार आहे. एवढेच नाही तर IP67 आणि चारशे एमएम वॉटर वेडिंग क्षमता इत्यादी वैशिष्ट्ये देखील महत्त्वपूर्ण आहेत.
किती आहे या स्कूटरची किंमत?
कंपनीने Rizta स्कूटरची किंमत एक लाख दहा हजार रुपये ठेवली असून यातील टॉप एन्ड व्हेरिएंटची किंमत एक लाख 45 हजार रुपये ठेवली आहे. यासोबत पाच वर्षाची वारंटी देखील दिली आहे.