Fastag Rule : तुम्ही देखील फास्टटॅगचा वापर करता का! जर हो तर अगोदर हे वाचा, नाहीतर होईल दंड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fastag Rule:- जेव्हा आपण महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल भरावा लागतो. हा टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण टोल नाक्यावर बघतो. त्यानंतर मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून फास्ट टॅगची  सुरुवात केली.

फास्टटॅग हे एक डिजिटल स्टिकर असून रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. आपल्याला माहित आहेच की या माध्यमातून रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी तुम्ही या फास्टटॅगचा वापर करू शकता.

सध्या परिस्थितीमध्ये रोख पैशांनी किंवा कॅशलेस अशा दोन पद्धतीने तुम्ही टोल भरू शकतात. याच फास्टटॅग बद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक नवीन आदेश जारी केला असून त्यानुसार आता काही गोष्टींची पूर्तता करणे खूप गरजेचे राहणार आहे. जर असे केले नाही तर दंड देखील होऊ शकणार आहे. त्यामुळे आपण या लेखात फास्ट टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने कुठले आदेश दिले आहेत? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टटॅगबद्दल दिले नवे आदेश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून एक वाहन एक फास्टटॅग योजनेची सुरुवात केली असून या माध्यमातून आता अनेक वाहनांकरिता एकाच फास्टटॅगचा वापर किंवा विशेष वाहनाकरिता अनेक फास्टटॅग जोडण्यापासून अटकाव करणे हा उद्देश आहे.

त्यानुसार आता फास्टटॅगची निश्चित कालमर्यादेमध्ये केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून यासोबतच थकीत रकमेसह अपूर्ण केवायसी असलेले जे काही फास्ट टॅग असतील त्यांना 31 जानेवारी 2024 नंतर ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही असे न करता टोल वर गेले तर तुम्हाला दंड देखील भरावा लागण्याची शक्यता आहे.

 रस्ते वाहतूक मंत्रालयामधील अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

याबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयामधील पीआरबीची एडीजी जे.पी. मट्टू सिंह यांनी म्हटले की, या केवायसी करण्यामध्ये जुन्या फास्टटॅगचा समावेश असेल. कारण काही वर्षात घेतलेले फास्टटॅग हे आधार कार्डशी लिंक आहेत व त्यांची केवायसी देखील झालेली आहे.

परंतु ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले जे काही जुने फास्ट टॅग आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे समस्या दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फास्ट टॅगधारकांनी आपले खाते असलेल्या बँकेत जाऊन केवायसी अपडेट करून घेणे गरजेचे आहे. बँकेव्यतिरिक्त जर एखाद्याने पेटीएमवरून फास्ट टॅग घेतला असेल तर पेटीएममध्ये जाऊन ते अपडेट करणे गरजेचे आहे.

फास्टटॅग वापरकर्त्यांना आता एक वाहन एक फास्टटॅगचा वापर करावा लागेल. तसेच संबंधितांच्या बँकेच्या माध्यमातून अगोदर जे काही जारी करण्यात आलेले सर्व फास्टटॅग असतील ते सोडावे लागतील. यामध्ये आता फक्त नवीन फास्ट टॅग खाते सक्रिय राहतील.

जुने जे काही फास्ट टॅग आहेत ते 31 जानेवारी 2024 नंतर निष्क्रिय करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता फास्टटॅगची निश्चित कालमर्यादेत केवायसी करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. नाहीतर अपूर्ण केवायसी असलेले फास्टटॅग थकीत रकमेसह 31 जानेवारी 2024 नंतर ब्लॅकलिस्ट किंवा निष्क्रिय करण्यात येणार आहेत.