महिंद्रा अँड महिंद्रा कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून अनेक कारचे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल या कंपनीने लॉन्च केलेले आहेत. यामध्ये महिंद्राची बोलेरो निओ ही कार देखील या कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेले होते. परंतु आता महिंद्रा कंपनीच्या किफायतशीर एसयुव्हींपैकी एक असलेली
बोलेरो निओने मात्र ग्लोबल एनसीएपी चाचण्यांमध्ये फक्त एक स्टार रेटिंग मिळवले आहे. 2016 मध्ये महिंद्राच्या स्कार्पियो ला शून्य स्टार रेटिंग मिळाल्यानंतर हा महिंद्रा कंपनीच्या प्रवासी वाहनाला मिळालेला सर्वात कमी गुण आहे. जागतिक सुरक्षा वॉचडॉगच्या म्हणण्यानुसार बोलेरो निओने प्रौढ आणि लहान मुलांच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून जे काही संरक्षणासाठी काम करायला हवे होते त्यामध्ये खूप खराब कामगिरी केलेली आहे.
बोलेरो निओने केलेली खराब कामगिरी
ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अर्थात जीएनसीएपी च्या माध्यमातून सेफ कार्स फॉर इंडिया प्रोग्राम अंतर्गत महिंद्रा बोलेरो निओची चाचणी केली आहे व अनेक चाचण्यानंतर मिळालेले परिणाम ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामला प्रभावित करण्यात अपयशी ठरले आहेत. कारण या एसयूव्हीने एक स्टार रेटिंग मिळवली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की चाचणी केलेली युनिट दोन एअरबॅग सह सुसज्ज होते जे एसयुव्हीच्या सर्व प्रकारांमध्ये मानक आहे. झालेल्या चाचणीनंतर बोलेरो निओ हे महिंद्रा बॅज असलेले सर्वात कमी सुरक्षा रेटिंग असलेले वाहन ठरले आहे. बोलेरो निओने प्रौढ प्रवाशांसाठी 34 पैकी 20.26 गुण मिळवले.
तसेच या एसयूव्ही कारमध्ये चालकासाठी कमकुवत छाती आणि पायांसाठी संरक्षण होते तसेच परिणामांवर आधारित समोर आणि साईड इफेक्ट संरक्षणामध्ये लक्षणीय फरक होता. तसेच प्रवाशांसाठी पडदे एअरबॅग आणि सीट बेल्ट रिमाइंडर नसल्यामुळे कारचे रेटिंग घसरले.
तसेच लहान मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत या कारणे 49 गुणांपैकी 12.71 गुण प्राप्त केले. तीन पॉईंट सीट बेल्ट, प्रवासी एअर बॅग स्वीच आणि फक्त एक चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम नसल्यामुळे हे रेटिंग घसरले. झालेल्या विविध चाचण्यांमध्ये या कारचा स्कोर कमी करण्यामध्ये साईड फेसिंग सीटचा देखील मोठा हातभार आहे.या सर्व कारणांमुळे या कारला फक्त एक स्टार रेटिंग मिळाली आहे.