नुकतेच ग्लोबल एनसीएपी(NCAP) चे क्रॅश चाचणीचे निकाल प्रकाशित करण्यात आले व त्यामध्ये किया करेन्स, महिंद्रा बोलेरो निओ इत्यादी कारला मिळालेले रेटिंग सर्वांसमोर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिंद्रा बोलेरोची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली असून या कारला एक स्टार मिळाला आहे
तर त्या तुलनेत मात्र Kia Carens कारने यामध्ये चांगली कामगिरी करत लहान मुलांच्या सुरक्षा मध्ये पाच स्टार आणि प्रौढांच्या सुरक्षामध्ये तीन स्टार मिळवले आहेत. या चाचणीच्या अनुषंगाने पाहिले तर ही कार प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी उत्तम आहे असे आपल्याला म्हणावे लागेल.
Kia Carens ला मिळाले पाच स्टार
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतीच ग्लोबल NCAP ने किया कॅरेन्सचे क्रॅश चाचणी निकाल प्रकाशित केले असून त्यानुसार या एमपीव्ही सेगमेंट मधील कारला मुलांच्या सुरक्षेकरिता पाच स्टार आणि प्रौढांच्या सुरक्षेकरिता तीन स्टार मिळवले आहेत. महत्वाचे म्हणजे या कारची दोनदा चाचणी घेण्यात आली होती.
यामागील प्रमुख कारण म्हणजे जेव्हा प्रथम चाचणी घेण्यात आली तेव्हा प्रौढांच्या सुरक्षिततेमध्ये या कारला शून्य स्टार मिळाले होते. मे 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत या कारचे जे युनिट उत्पादित करण्यात आलेले होते त्यांना शून्य स्टार मिळाले आहेत. परंतु त्यानंतर उत्पादित केलेले जे काही युनिट आहे त्यांना मात्र तीन स्टार मिळाले आहेत.
प्रौढ आणि मुलांसाठी आहे सुरक्षित
ग्लोबल एनसीएपीद्वारे चाचणी केलेली एमपीव्ही फ्रंटल एयरबॅग्स, बेल्ट प्री टेन्शनर्स, बेल्ट लोड लिमिटर, साईड हेड कर्टन एअरबॅग्स आणि ISOFIX चाइल्ड सीट माउन्ट्सने ही कार सुसज्ज होती. कारचा ड्रायव्हर आणि मधील प्रवाशांच्या डोक्यावर समोरचा प्रभाव चांगला असल्याचे निकालांनी सांगितले.
या टेस्टमध्ये ड्रायव्हरच्या मानेला अपूर्ण संरक्षण मिळाले तर प्रवाशांच्या मानेला चांगले संरक्षण मिळाल्याचे दिसून आले. जर साईड इफेक्टच्या दृष्टीने पाहिले तर डोके, छाती आणि पोट यांचे संरक्षण चांगले होते. त्यासोबतच बाजूच्या खांबांवर परिणाम झाला नाही. तसेच ही कार सर्व प्रकारांमध्ये मानक म्हणून सर्व सेटिंग पोझिशनमध्ये तीन पॉईंट बेल्ट देते.
किती आहे किया कॅरेन्स कारची किंमत?
सध्या या कारची किंमत दहा लाख 52 हजार रुपये ते 19 लाख 57 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या दोन्ही किमती एक्स शोरूम आहेत. विशेष म्हणजे ही कार ग्राहकांना सहा आणि सात सीटर लेआउट मध्ये मिळू शकते व त्यासोबतच तीन इंजिन पर्याय आहेत ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कारची निवड करू शकतात.