7 Seater Car : नव्या वर्षात नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. खरंतर भारतीय बाजारात अलीकडे सेव्हन सीटर कारची मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे.
भारतीयांची हीच मागणी पाहता देशातील अनेक प्रमुख कारनिर्मात्या कंपन्यांनी आता सेवन सीटर कार बनवण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. खरे तर ह्युंदाई मोटर ही एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
गेल्या वर्षी या कंपनीने एक्स्टर ही बजेट एसयूव्ही कार लॉन्च केली. ही कार लॉन्च झाल्यानंतर या कारने अल्पकालावधीतच ग्राहकांच्या मनात आपली जागा बनवली आहे. ही कार तरुणाईला अक्षरशा वेड लावत आहे. अशातच आता कंपनीच्या माध्यमातून 16 जानेवारी 2024 ला क्रेटा या लोकप्रिय मॉडेलचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले जाणार असे वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे ह्युंदाई मोटर्स क्रेटा हे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केल्यानंतर लगेचच एक नवीन सेवन सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हुंदाई ही कंपनी क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च झाल्यानंतर स्टार गेजर ही सेव्हन सीटर कार लॉन्च करणार अशी शक्यता आहे.
मात्र या संदर्भात ह्युंदाई या कार मेकर कंपनीच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत कंपनीकडून योग्य ती माहिती दिली जाईल अशी आशा व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण या हुंदाईच्या स्टारगेजर या सेव्हन सीटर कारची थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स
मीडिया रिपोर्ट नुसार, Hyundai कंपनी Stargazer ही सेव्हन सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी केव्हा लॉन्च होणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्स मध्ये ही गाडी भारतीय बाजारात लवकरच येऊ शकते असे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे या गाडीचे लोक आणि फीचर्स कसे असणार याबाबत देखील महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या कारमध्ये स्प्लिट हेडलॅम्प, नवीन फ्रंट ग्रिल, LED DRL, स्लोपिंग रूफलाइन, शार्क फिन अँटेना, मोठे पॅनोरामिक सनरूफ, ब्लू लिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञान, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमची स्वायत्त फीचर्स पाहायला मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे.
या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारमध्ये 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले जात आहे. या कारमधील हे इंजिन 113 bhp ची कमाल पॉवर आणि 145 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम राहील. यात 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन देखील असू शकते,
जे 113 bhp पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल, असाही दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. या MPV कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असू शकते.
कंपनी सीएनजी पर्यायातही ही गाडी लॉन्च करेल असा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. यामुळे आता ह्युंदाई ही कंपनी खरच ही कार बाजारात लॉन्च करणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.