Hero Mevrick Bike: हिरो मोटोकोर्पने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली बाईक! वाचा या बाईकचे वैशिष्ट्ये आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Mevrick Bike:- भारतामध्ये अनेक बाईक निर्मिती करणाऱ्या महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध कंपनी असून यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हिरो मोटोकॉर्प, होंडा तसेच बजाज यासारख्या कंपन्यांचा समावेश आपल्याला करता येतो. या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक भन्नाट असे वैशिष्ट्य असलेल्या बाईक लॉन्च करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये जर आपण हिरो मोटोकॉर्प  या कंपनीचा विचार केला तर या कंपनीने सर्वात प्रीमियम आणि शक्तिशाली अशी बाईक मेव्हरीक 440 लाँच करणार असून भारतातील रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 तसेच हार्ले डेविडसन X 440, जावा 350 यासारख्या बाईक सोबत या बाईकची स्पर्धा असणार आहे.

 कशी आहे हीरो मेव्हरिक बाईकची डिझाईन?

हिरो मोटोकॉर्पच्या माध्यमातून त्यांच्याच अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गाडीच्या डिझाईन आणि स्पेक्सबद्दल काही माहिती देण्यात आली असून त्या माहितीनुसार पाहिले तर या बाईकच्या पुढच्या बाजूला ट्विन टच आकाराचा डीआरएलसह गोल हेडलॅम्प देण्यात आलेला आहे.

वाहनांमध्ये ट्यूबलर स्टाईल हँडल बार, वक्र इंधन टाकी आणि सिंगल सीट देण्यात आलेले आहे. तसेच एलईडी इंडिकेटर आणि संपूर्ण एलईडी लाइटिंग आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सह एलसीडी डिस्प्ले यासारखी अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत. या बाईक मध्ये स्पोर्टी असं मजबूत लुक देण्यात आलेला आहे.

 हिरो मेव्हरीक बाईकचे इंजिन आणि परफॉर्मन्स

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिरोच्या या मेव्हरिक बाईक मध्ये हार्ले डेविडसन X440 सारखेच इंजिन वापरण्यात आलेले असून त्यामध्ये थोडेफार बदल असण्याची शक्यता आहे. यामध्ये 440cc सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन 47 बीएचपी पावर आणि 37 एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

तसेच आपण या गाडीचे इतर वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये निगेटिव्ह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल अतिशय स्वच्छ असून स्पीडोमीटर, टॅको मीटर तसेच गिअर पोझिशन इंडिकेटर, रेंज आणि मायलेज इंडिकेटर आणि साईड स्टॅन्ड अलर्टशी संबंधित माहिती पुरवतो. हिरो मॅवरिक बाईक मध्ये टर्न बाय टर्न नेवीगेशन,

कॉल आणि एसएमएस अलर्ट, डिजिटल घड्याळ, इस्टिमेटेड प्राईम ऑफ अरायव्हल, अंतराने फोन बॅटरी इंडिकेटर सह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आलेली आहे. रायडीग करताना ते आरामदायी व्हावी याकरिता पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स मागच्या बाजूला ड्युअल स्प्रिंग देण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर ही बाईक डायमंड कट अलॉय व्हीलवर चालणार आहे. तसेच उत्तम ब्रेकिंग करिता या बाईकला ड्युअल चॅनल एबीएस सह दोन्ही टोकांना सिंगल डिस्क ब्रेक मिळणार आहेत.

 किती आहे या बाईकची किंमत?

हिरो मेव्हरीक 440 बाईकची एक्स शोरूम किंमत सुमारे दोन लाख रुपये असण्याची शक्यता आहे.