बाईक घ्यायची तर घ्या हिरोची ‘ही’ 125cc स्टायलिश बाईक! विक्री देखील आहे प्रचंड, वाचा वैशिष्ट्ये आणि किंमत

Ajay Patil
Published:
hero xtreme 125r bike

भारतामध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या असून यामध्ये प्रामुख्याने हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज या कंपनीचे नाव प्रामुख्याने बाईक उत्पादक कंपन्यांमध्ये अग्रस्थानी आहे. या तीनही कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्प ही कंपनी निव्वळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक मोटरसायकल उत्पादक कंपन्यांमध्ये सरस आहे.

संपूर्ण मोटरसायकल बाजारपेठेमध्ये या कंपनीचा दबदबा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये हिरो मोटोकॉर्पच्या बाईकची मागणी सातत्याने वाढत असून विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होते. हिरो मोटोकोर्पने आतापर्यंत अनेक वेगवेगळे बाईकचे उत्पादन केले असून त्यांची वैशिष्ट्ये व किंमत देखील वेगवेगळे आहेत.

याच प्रकारे हिरो मोटोकोर्पने जानेवारी 2024 म्हणजेच या वर्षाच्या सुरुवातीला Xtreme 125R ही 125cc सेगमेंट मधील सर्वात स्टायलिश मोटरसायकल लाँच केली. ही मोटरसायकल दिसायला स्टाईलिश नसून ती तिच्या सेगमेंट मधील उत्कृष्ट अशी वैशिष्ट्यांसह येते.

 कसे आहे हिरो Xtreme 125R बाईकचे इंजिन?

हिरो मोटोकोर्पने या बाईकमध्ये पूर्णपणे नवीन स्वरूपाचे इंजिन बसवले असून ते 125cc इंजिन असून ते खास या बाईकसाठी विकसित करण्यात आलेले आहे. हे इंजिन कंपनीच्या इतर 125cc इंजिनपेक्षा जास्त पावर आणि टॉर्क जनरेट करते. म्हणजेच हे इंजिन 11.55 बीएचपीची पावर आणि 10.5 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच हे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज असून सिटी राईड आणि हायवे या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. तसेच कंपनीच्या माध्यमातून या बाईकची संपूर्ण डिझाईन शार्प आणि आक्रमक अशी करण्यात आलेली आहे.

 हिरो Xtreme 125R बाईकची इतर वैशिष्ट्ये

ही बाईक 125cc च्या विभागातील पहिली बाईक आहे जी प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प आणि सिंगल चॅनेल एबीएस सारख्या वैशिष्ट्यांसह येते.या बाईकमध्ये पूर्णपणे एलईडी लाईट सेटअप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व हेडलाईट आणि टेललाईट व्यतिरिक्त एलईडीमध्ये टर्न इंडिकेटर देखील दिले गेले आहेत. तसेच एखाद्या धोक्याच्या प्रकाशाचे कार्य देखील यामध्ये देण्यात आलेले आहे. पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील असून ज्यामुळे बाईक प्रीमियम दिसते.

 किती आहे या बाईकची किंमत?

हिरो मोटोकॉर्पच्या हिरो Xtreme 125R या बाईकची बेस मॉडेलची किंमत 99 हजार पाचशे रुपये( एक्स शोरूम) पासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe