Honda Elevate SUV : उद्या लाँच होणार होंडाची जबरदस्त SUV, ग्रँड विटाराला देणार टक्कर; शानदार फीचर्ससह किंमत असणार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda Elevate SUV : भारतीय बाजारपेठेत सध्या मध्यम आकाराच्या SUV ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या मध्यम आकाराच्या SUV बाजारात लाँच करत आहेत. अशातच आता होंडा ही लोकप्रिय कार निर्माता कंपनी आपली SUV लाँच करणार आहे.

कंपनी उद्या Elevate SUV लाँच करणार आहे. दरम्यान कंपनी अनेक दिवसांपासून या SUV वर काम करत होती. यात तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन SUV घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल.

Hyundai Creta, Tata Harrier, Jeep Compass तसेच Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyrider आणि इतरांचे वर्चस्व असणाऱ्या सेगमेंटमध्ये नवीन Honda Elevate SUV ही कंपनीची पहिली ऑफर असणार आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, Honda Elevate चा जागतिक प्रीमियर उद्या सादर केली जात आहे. हा मोठा कार्यक्रम जगभरातील दर्शकांसाठी YouTube वर दुपारी 12 वाजता थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

असे असेल Honda Elevate SUV चे डिझाईन

टीझर इमेजेस किंवा लीक झालेले स्पाय शॉट्स पहिले तर, सेगमेंटमधील इतर कारच्या तुलनेत Honda Elevate SUV थोडी प्लश आणि शाही दिसत आहे. कंपनीची ही कार मुख्यत्वे Honda HR-V SUV सारखीच असणार आहे जी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आहे.

तसेच या SUV च्या पुढील भागात स्लीप LED DRL आणि क्षैतिज रेषा असणारी क्रोम ग्रिल आहे. कंपनीच्या या कारला डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि रॅपराउंड एलईडी टेल लाईट सेटअप मिळू शकतो.

खासियत

कंपनीच्या नवीन SUV मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, लेन वॉच सिस्टम आणि 360-डिग्री कॅमेरा मिळू शकतो. यात सहा एअरबॅग, ESC, VSM, हिल लाँच असिस्टंट असणार आहेत. तसेच यात एलईडी हेडलॅम्प, गोलाकार फॉग लॅम्प आणि डीआरएल तुम्हाला पाहायला मिळतील. ही SUV 4.3 मीटरची असून कंपनीची आगामी कार बाजारात मारुती सुझुकी ग्रँड विटाराला टक्कर देऊ शकते असे कार तज्ञांचे मत आहे.