रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडाने लॉन्च केली नवीन बाईक, काय आहेत फिचर्स अन किंमत ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda New Bike : या नव्या वर्षात बाईक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना एडवेंचर बाईक खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. यामुळे एडवेंचर आणि स्पोर्ट बाईक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी ठरणार आहे.

खरे तर होंडा ही देशातील एक लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीच्या अनेक बाइक्स ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. दरम्यान कंपनीने NX500 ही एडवेंचर बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक केटीएम 390 ॲडव्हेंचर, रॉयल एनफिल्ड हिमालय 450 या बाईक सोबत स्पर्धा करणार आहे. यामुळे आता ग्राहक या बाईकला प्रेम दाखवतात का, रॉयल एनफिल्ड सारख्या दिग्गज कंपनींच्या गाडीसोबत ही बाईक स्पर्धा करेल का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान आता आपण होंडाने लॉन्च केलेल्या या नवीन गाडीची विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बाईकच्या विशेषता थोडक्यात

मिळालेल्या माहितीनुसार, Honda कंपनीने लॉन्च केलेली NX500 एडवेंचर टूररचे बुकिंग भारतात सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या बाईकची बुकिंग खूपच कमी किमतीत सुरू करण्यात आली आहे. होंडा बिग विंग डीलरशिपवर ग्राहक फक्त अन फक्त 10,000 रुपये देऊन या दमदार गाडीची बुकिंग करू शकणार आहेत. मात्र या गाडीची डिलिव्हरी ग्राहकांना केव्हा मिळणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच या गाडीची डिलिव्हरी ग्राहकांना मिळणार आहे यात शंकाच नाही.

NX500 ही कंपनीची मध्यम-श्रेणीची ADV बाईक राहणार आहे. होंडा कंपनीने नुकतीच सीबी 500X ही बाईक बंद केली आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये नव्याने सामील झालेली ही गाडी या अलीकडेच बंद झालेल्या गाडीची कमतरता दूर करेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे ही नव्याने लॉन्च झालेली गाडी सीबी 500X पेक्षा अधिक दमदार आणि बेस्ट रायडींग अनुभव देणार आहे.

नव्याने लॉन्च झालेल्या गाडीच्या सीट ची उंची 830 mm एवढी आहे. या गाडीमध्ये USD फोर्क सस्पेन्शन आणि मोनोशॉक सस्पेन्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाईकमध्ये 19-इंच फ्रंट आणि 17-इंच मागील अलॉय व्हील आणि ब्लॉक-पॅटर्न टायर देण्यात आले आहेत. या गाडीला पुढच्या बाजूला एक ट्विन डिस्क आणि मागील चाकाला एक डिस्क देण्यात आला आहे.

या बाइकमध्ये 471cc पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp पॉवर आणि 43Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीने केला आहे. बाईकला देण्यात आलेले इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले राहणार आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह पाच-इंचाचा TFT डिस्प्ले यासह चांगली किट पॅक देण्यात आली आहे.

या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही बाईक पाच लाख 90 हजार रुपये एक्स शोरूम किमतीसह लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकची ही सुरुवातीची किंमत आहे याचाच अर्थ इतर व्हेरियंटची किंमत यापेक्षा अधिक राहणार आहे. शिवाय ही एक्स शोरूम किंमत राहणार असल्याने ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहील याची नोंद ग्राहकाने घ्यायची आहे.