Honda SP160 : कमी किंमत अन् शक्तिशाली इंजिन! Pulsar आणि Apache ला टक्कर देण्यासाठी येतेय होंडाची बाईक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda SP160 : भारतीय बाजारात अनेक बाईक्स लाँच होत असतात. यातील काही बाईक्सच्या किमती जास्त असतात तर काही बाईक्सच्या किमती कमी असतात. प्रत्येक कंपनीच्या बाईकमध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळते.

अशातच जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही होंडाची नवीन बाईक कमी किंमत अन् शक्तिशाली इंजिनसह सहज खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही बाईक Pulsar आणि Apache ला टक्कर देते.

जाणून घ्या खासियत

हे लक्षात घ्या की SP 160 ही मुळात आधीच्या SP125 ची मोठी आवृत्ती असून जी जास्त वजनदार इंजिनसह सादर करण्यात आलेली आहे. दोन्ही बाईकचा लुक आणि डिझाईन जवळपास सारखे आहे. बॉडी पॅनल, V-आकाराचे एलईडी हेडलाइट, थोडेसे रुंद टँक, सिंगल ग्रॅब रेल, सिंगल-पीस सीट, क्रोमसह साइड-स्लंग एक्झॉस्ट मफलर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. म्हणजेच नवीन Honda SP 160 हे कंपनीच्या अनेक मॉडेल्सचे मिश्रण आहे.

या बाईकमध्ये, कंपनीकडून 162.7cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 7,500 rpm वर 13.46 bhp पॉवर आणि 14.58 Nm चा पीक टॉर्क जनरेट करत आहे. ही बाइक 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

बाईकच्या पुढील बाजूस पारंपरिक टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन दिले आहे. याच्या फ्रंटला सिंगल-चॅनल एबीएससह 276 मिमी फ्रंट डिस्क आणि 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक दिले आहे. तसेच कंपनीकडून या बाईकमध्ये 17-इंचाची अलॉय व्हील्स देण्यात आली असून जी 80/100 आकाराच्या समोर आणि 130/70 आकाराच्या मागील MRF Nylogrip टायर्सवर चालतात. या बाईकला 177 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळत आहे.

यात इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचसह पूर्ण-डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळत आहे. तसेच इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये, तुम्हाला ओडोमीटर, स्पीडोमीटर, इंधन-गेज आणि गियर पोझिशन इंडिकेटर मिळतील. बाईक एकूण पर्ल स्पार्टन रेड, मॅट डार्क ब्लू मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल इग्नाइट ब्लॅक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे मेटॅलिक आणि मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक अशा पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

स्पर्धा

लाँच झाल्यानंतर बाजारात ही बाईक प्रामुख्याने बजाज पल्सर N160 तसेच TVS Apache RTR 160 सारख्या मॉडेल्सला टक्कर देईल. किमतीचा विचार केला तर बाईकची किंमत अनुक्रमे 1.31 लाख आणि 1.19 लाख रुपयांपासून सुरू होते. Honda Unicorn ची स्पोर्टी आवृत्ती आहे.