Personal Loan: पर्सनल लोन घेण्यासाठी बँकांपेक्षा करा ‘या’ पर्यायाचा वापर! अनेक पद्धतीने मिळेल फायदा

Ajay Patil
Updated:
personal loan

 

Personal Loan:- जीवनामध्ये अचानक उद्भवलेली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा आपल्याकडे असेलच असे होत नसल्यामुळे बरेच जण कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. कर्ज घ्यायचे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ती बँक. कारण तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असेल किंवा पर्सनल लोन घ्यायचे असेल तर प्रत्येक जण बँकेचा दरवाजा ठोठावतो.

परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर बँकांमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जर एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून घेतले तर ते फायद्याचे ठरू शकते.

अशाप्रकारे एनबीएफसी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये आपल्याला बजाज फायनान्स किंवा आदित्य बिर्ला कॅपिटल, मुथूट फायनान्स यासारख्या एनबीएफसीचा उल्लेख करता येईल. त्यामुळे या लेखामध्ये आपण बँकेपेक्षा एनबीएफसी कडून पर्सनल लोन घेणे कसे फायद्याचे ठरते? याबाबतची माहिती घेऊ.

 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून पर्सनल लोन घेण्याचे फायदे

1- जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते तुम्ही जर एखाद्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून जर पर्सनल लोन घ्यायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला बँकेच्या तुलनेमध्ये जास्त कर्ज मिळू शकते.

कारण बऱ्याच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी या लोन घेणाऱ्याची गरज पाहून व त्यानुसार कर्ज देतात. फक्त कर्ज घेणाऱ्याची प्रोफाइल याकरिता व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यामध्ये 25 लाख ते 40 लाखापर्यंत देखील काही एनबीएफसी पर्सनल लोन देऊ शकता.

2- पात्रतेचे निकष बँकांच्या तुलनेमध्ये एनबीएफसीमध्ये तुम्ही पर्सनल लोनची पात्रता बघितली तर त्यासाठीचे निकष साधे व सोपे असतात. म्हणजेच वेगवेगळ्या क्रेडिट प्रोफाइलचे व्यक्तींनी अर्ज केले तरी त्यावर विचार करण्यासाठी ते खुले असतात.

3- सोपी सुलभ अर्जप्रक्रिया बँकेकडून जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर बँकेची प्रक्रिया अनेक दृष्टिकोनातून वेळ खाऊ असते. परंतु त्या तुलनेत मात्र नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांची प्रक्रिया अतिशय सोपी असते व सर्व प्रोसेस ऑनलाईन पूर्ण होते. विशेष म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात.

4- खूपच कमी कागदपत्रांची आवश्यकता जर नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये तुम्ही जर पर्सनल लोन घ्यायला गेला तर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रे लागतात. परंतु त्या दृष्टिकोनातून बँकांमध्ये खूप जास्त कागदपत्र किंवा पेपरवर्क असते व अनेक पेपरवर तुम्हाला साईन देखील कराव्या लागतात.

परंतु नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये आवश्यक कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन सबमिट करू शकतात. या कागदपत्रांमध्ये तुम्हाला आयडी प्रूफ तसेच ऍड्रेस प्रूफ व इन्कम प्रूफ, बँक स्टेटमेंट इत्यादी द्यावे लागते.

5- व्याजदरांवर बार्गेनिंग करण्याची संधी साधारणपणे पर्सनल लोनचे व्याजदर हे एनबीएफसी व बँकांचे जवळजवळ सारखेच आहेत. परंतु जे व्यक्ती कर्ज घेत आहे त्याची प्रोफाईलवर देखील व्याजदर अवलंबून असतात.

साधारणपणे टाटा कॅपिटल वार्षिक 10.99% ते 35 टक्के, आदित्य बिर्ला कॅपिटल 14% ते 26 टक्के, बजाज फिन्सर्व 11% ते 38% व मुथूट फायनान्स 14 ते 22% पर्यंत व्याजदर ऑफर करते. परंतु तुम्ही तुमच्या प्रोफाईल नुसार नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना व्याजदराबाबत बार्गेनिंग करू शकतात.