oyota Innova Crysta EMI Calculator:- स्वतःची कार असणे हे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. खासकरून जे युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायला सुरुवात करतात त्यानंतर बरेच जण लगेच कार घेण्याच्या तयारीला देखील सुरुवात करतात. त्यातल्या त्यात आता विविध बँकांच्या माध्यमातून अगदी सहजरित्या कारलोन दिले जात असल्यामुळे बरेचजण कार लोन घेऊन कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात.
साहजिकच तुम्ही जर कार घेण्यासाठी लोन घेतले तर त्याचा तुम्हाला मासिक ईएमआय भरणे गरजेचे असते. याकरता तुम्ही कार घेताना डाऊन पेमेंट किती करत आहात? कारची किंमत किती आहे? या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो.
याचा अनुषंगाने समजा तुम्हाला जर इनोव्हा क्रिस्टा घ्यायची असेल तर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते व त्याचा मासिक ईएमआय तुम्हाला किती भरावा लागेल? किती पगार तुम्हाला असेल तर ही कार घेणे तुम्हाला परवडेल? इत्यादी गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
इनोव्हा क्रिस्टाची किंमत आणि भरावा लागणारा ईएमआय?
जर आपण टोयोटाच्या इनोव्हा क्रिस्टाची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती साधारणपणे 19 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 26 लाख 55 हजार रुपये पर्यंत जाते.
नवी दिल्लीमध्ये या कारच्या बेस वेरिएंटची ऑन रोड किंमत सुमारे 23 लाख 75 हजार रुपये पर्यंत आहे. परंतु ही ऑन रोड किंमत प्रत्येक शहरानुसार बदलू शकते. या किमतीनुसार जर बघितले तर दिल्लीमध्ये तुम्ही टोयोटा इनोवा क्रिस्टाचे बेस्ट व्हेरियंट खरेदी केले व त्याकरिता जर चार लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून 19 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज मिळते.
समजा तुम्ही हे कर्ज पाच वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला पाच वर्षांकरिता हे कर्ज 9.8% व्याजदराने परत करावे लागेल.अशाप्रकारे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 42 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
तसेच यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे यावर देखील व्याजदर अवलंबून असतो. यावरून आपण विचार करू शकतो की,जर तुम्हाला टोयोटा इनोवा क्रिस्टा लोन घेऊन खरेदी करायची असेल तर मात्र तुमचा पगार एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल तरच ही कार खरेदी करावी.
काय आहेत या कारमध्ये वैशिष्ट्ये?
या कारमध्ये बसवलेले एलईडी हेडलॅम्पमुळे ही कार खूप आकर्षक आणि उत्कृष्ट अशी दिसते. या कारमध्ये 20.32 cm डिस्प्ले देण्यात आला असून ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटीचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमचा मोबाईल फोन देखील तुम्ही या कारशी कनेक्ट करू शकतात.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, वाहन स्थिरता नियंत्रण तसेच हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टलच्या जी आणि जी एक्स प्रकारामध्ये तीन एअर बॅगचे वैशिष्ट्य देण्यात आलेले आहेत. त्यासोबत या कारच्या VX आणि ZX व्हेरियंटमध्ये सात एअर बॅगचे वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.