Maruti Fronx : मारुती सुझुकी Fronx किती आहे सुरक्षित? पहा क्रॅश चाचणीचा व्हिडीओ आणि सुरक्षा फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Fronx : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक नवनवीन कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या जात आहेत. मारुती सुझुकीकडून अगदी कमी बजेटमध्ये त्यांच्या कार सादर केल्या जात असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकीने या वर्षीच त्यांची Fronx कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार लाँच केली आहे. Fronx एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मारुती सुझुकीने त्यांच्या Fronx एसयूव्ही कारची क्रॅश चाचणी फुटेज जारी केले आहेत. यामध्ये कारच्या क्रशचाचणीमधील गुण जाहीर केले नसून मारुती सुझुकी त्यांच्या कारमध्ये कशी सुरक्षा देते याची एक झलक दाखवत आहे.

मारुती फ्रॉन्क्स क्रॅश चाचणी फुटेज?

मारुती सुझुकीने त्यांच्या Fronx एसयूव्ही कारच्या क्रॅश चाचणीचे दोन व्हिडीओ जारी केले आहेत. यामध्ये फ्रंट इम्पॅक्ट आणि साइड इफेक्ट दाखवण्यात आले आहेत. या क्रॅश चाचण्यांमध्ये दोन ड्राइव्हरसारखे डमी वापरण्यात आले आहेत.

Fronx कारच्या फ्रंट क्रॅश चाचणीमध्ये 50 किमी वेगाने कार समोरच्या बाजूस धडकवण्यात आली आहे. कार समोरच्या बाजूला धडकल्यानंतर अधिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारमध्ये देण्यात आलेल्या एअरबॅग्स त्वरित उघडताना दिसत आहेत.

तसेच कारची साइड क्रॅश चाचणी घेताना कारवर 60 किमी वेगाने एक आधुनिक मशीन धडकावले जाते यानंतर कारच्या एअरबॅग्स लगेच उघडताना देखील दिसत आहेत. दोन्ही क्रीसह चाचणीमध्ये Fronx आर किती सुरक्षित आहे हे दाखवण्यात आले आहे.

मारुती फ्रॉन्क्स क्रॅश चाचणीत किती सुरक्षित आहे?

मारुती सुझुकीची Fronx एसयूव्ही कार किती सुरक्षित आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मारूतीनेच या कारची चाचणी घेतल्याने कार किती सुरक्षित आहे हे अद्याप समोर आलेले नाही. Fronx कारची भारत NCAP क्रॅश चाचणी अद्याप केलेली नाही.

मारुती सुझुकीकडून Fronx कारची करण्यात आलेली क्रॅश चाचणी कारची मजबूत बॉडी, एअरबॅग्ज, ब्रेक अँटी-लॉक सिस्टम (एबीएस) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस) किती कार्यक्षम आहे हे दर्शवते. कारला चाचणीमध्ये किती गुण मिळतात हे पाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागेल.

मारुती सुझुकी Fronx सुरक्षा वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीने त्यांच्या Fronx कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, ABS, TCS आणि मजबूत बॉडी देण्यात आली आहे. लवकरच कारची अधिकृत क्रॅश चाचणी देखील केली जाणार आहे. सध्या मारुतीने केलेल्या क्रॅश चाचणीत Fronx एसयूव्ही मजबूत दिसून येत आहे.