भारतीय कार बाजारात धुमाकूळ घालायला लवकरच येणार ह्युंदाईची नवीन इलेक्ट्रिक क्रेटा! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

सध्या भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात येत आहेत व त्यामध्ये परवडणारी किंमत तसेच उच्च परफॉर्मन्स असलेल्या कार देखील लॉन्च करण्यात येणार आहेत व त्यामध्ये महत्वाचे असलेली ह्युंदाई ही कार उत्पादक कंपनी देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक क्रेटा मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on -

Hyundai Creta Electric SUV:- सध्या भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात येत आहेत व त्यामध्ये परवडणारी किंमत तसेच उच्च परफॉर्मन्स असलेल्या कार देखील लॉन्च करण्यात येणार आहेत व त्यामध्ये महत्वाचे असलेली ह्युंदाई ही कार उत्पादक कंपनी देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक क्रेटा मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडच्या कालावधीमध्ये ह्युंदाईची नवीन इलेक्ट्रिक क्रेटा चाचणी दरम्यान अनेक वेळा दिसली व त्यामध्ये या कारचे काही डिझाईन पाहायला मिळाले. त्यानुसार जर बघितले तर या नवीन इलेक्ट्रिक क्रेटा मध्ये नवीन हेडलाइट्स, नवीन बंपर तसेच नवीन डिझाईन केलेले अलॉय व्हील्स आणि प्रीमियम टच ग्रील मिळणार आहेत

व ज्यामुळे ही कार अत्यंत आधुनिक आणि प्रीमियम दिसेल. ही नवीन ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक 2025 च्या इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये समोर येईल अशी शक्यता असून त्यानंतरच या कारची संपूर्ण डिझाईन समोर येईल.

ही कार मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर तिची स्पर्धा प्रामुख्याने टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक तसेच महिंद्राच्या सर्व नवीन BE6 आणि XEV 9e व टाटाच्या आगामी हॅरियर इलेक्ट्रिकशी असणार आहे.

कसे असू शकते ह्युंदाई नवीन क्रेटा इलेक्ट्रिकचे इंटेरियर?
ह्युंदाईच्या या नवीन क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये तुम्हाला आयसीई क्रेटा प्रमाणेच इंटिरियर मिळणार आहे व या दोन्ही वाहनांमध्ये वैशिष्ट्ये देखील समानच असतील अशी शक्यता आहे. अजून पर्यंत या कारची कोणतीही माहिती रिवील करण्यात आलेली नाही.

परंतु चाचणी पाहता असे दिसते की या वाहनाच्या डिझाईनमध्ये फारसा बदल होणार नाही. या नवीन ब्रँडमध्ये एक नवीन लोखंडी जाळी आणि 18 इंच इलेक्ट्रिक स्टाईल अलॉय व्हील्स मिळतील अशी एक शक्यता आहे.

तसेच ह्युंदाईच्या ICE मॉडेलमध्ये जशी प्रगत वैशिष्ट्ये आहेत तसेच वैशिष्ट्ये यामध्ये मिळतील. या नवीन क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये 10.25 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळेल व ज्यामध्ये तुम्ही एप्पल कार प्ले,अँड्रॉइड ऑटो व त्यासोबत 360 डिग्री कॅमेरा यासारखे वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात.

ही कार एक हायस्पीड आणि लांब पल्ल्याची कार असणार आहे. परंतु अधिकचे वैशिष्ट्ये हे भारत मोबिलिटी शो 2025 मध्येच कळतील अशी एक शक्यता आहे.

तुम्हाला जर एखादी प्रीमियम आणि उच्च परफॉर्मन्स असलेली इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर येणारी ही ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक तुमच्यासाठी फायद्याचा पर्याय ठरू शकतो.

किती असू शकते किंमत?
ह्युंदाईच्या आगामी येऊ घातलेल्या या नवीन क्रेटा इलेक्ट्रिकच्या लॉन्चची तारीख आणि किंमत याबद्दल अजून पर्यंत कुठलीही अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही.

या नवीन क्रेटा इलेक्ट्रिकची किंमत वीस लाख रुपये एक्स शोरूम पासून सुरु होण्याची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु ही निश्चित किंमत नाही. ह्युंदाई या नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे तपशील लवकरच उघड करेल तेव्हा पुरेशी माहिती उपलब्ध होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!