Tata EV Discount: टाटाची इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर ‘या’ टाटाच्या कारवर मिळत आहे भरघोस सूट! मिळेल कमी किमतीत

Ajay Patil
Published:
Tata EV Discount

Tata EV Discount :- सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारचा समावेश असून अनेक नामांकित कंपन्या आता वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करताना आपल्याला दिसून येत आहेत.

यामध्ये टाटा मोटर्स देखील मागे नसून टाटा मोटर्स देखील आता इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे व त्यासोबतच काही इलेक्ट्रिक कारवर चांगले सूट देखील देत आहे.

याच सूटच्या अनुषंगाने जर पाहिले तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जर टाटा मोटर्सची नवीन कार घ्यायचा प्लॅनिंग असेल तर कंपनीच्या माध्यमातून या महिन्यात ग्राहकांना कारवर चांगली सूट देण्यात येत आहे.

तुम्ही जर या महिन्यात टाटा टियागो इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर तुम्हाला तब्बल 85 हजार रुपये पर्यंत बचत करता येणे शक्य होणार आहे.

टाटा मोटर्स देत आहे टाटा टियागो इलेक्ट्रिक कारवर सूट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्राहकांनी जर एप्रिल महिन्यात म्हणजेच या महिन्यात जर टाटा टियागो इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर टाटा मोटर्स कडून 85 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे व ही सूट कंपनीकडून लिमिटेड स्टॉकवर देण्यात येत आहे.

जर तुम्हाला देखील या संबंधीची अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही टाटा मोटर्स डीलरशिपशी संपर्क करू शकतात. टाटाची टियागो ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मिनी कार असून ती एक इलेक्ट्रिक कार आहे.

काय आहेत टाटा टियागो इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये?

टाटा टियागो इलेक्ट्रिक कारमध्ये 19.2kWh आणि 24kWh क्षमतेचे दोन बॅटरी पॅक देण्यात आलेली असून ही सिंगल चार्जिंग मध्ये 250 किलोमीटर ते 315 किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टाटा टियागो इलेक्ट्रिक कारमध्ये दोन एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेक सिस्टम आणि ईबीडी सारखे फिचर देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे टाटा टियागो इलेक्ट्रिक कारला क्रॅश टेस्टमध्ये चार स्टार एनसीईपी रेटिंग मिळाली आहे.

तसेच या कारमध्ये सात इंचाच्या टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. जो अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्ट करतो त्यासोबतच ग्राहकांना या कारमध्ये चार स्पीकर देखील मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe