Upcoming Tata Electric Car:- सध्या जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसून येत असून अनेक प्रकारची वाहने जसे की, बाईक तसेच इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक कार्स उत्पादित केल्या जात असून अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा ट्रेंड आता वाढताना दिसून येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर टाटा मोटरचे यामध्ये वर्चस्व दिसून येते. भारतातील एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये टाटा मोटर्सचा सुमारे 65% चा वाटा आहे. त्यातही पुढे पाऊल टाकत आता टाटा मोटर्स लवकरच तीन आकर्षक इलेक्ट्रिक कार्स मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्ट मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा विचार केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये टाटा मोटर्सच्या माध्यमातून तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येणार आहेत व या तीन इलेक्ट्रिक कारच्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल आणि ड्रायव्हिंग रेंज बद्दल आपण माहिती घेऊ.
टाटा आणणार तीन इलेक्ट्रिक कार
1- टाटा हॅरिअर ईव्ही- टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय एसयुव्ही हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर तसेच वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि पॅनोरमिक सनरूफ इत्यादी वैशिष्ट्ये या कारमध्ये असतील.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारला 360 डिग्री सराऊंड कॅमेरा आणि लेव्हल दोन एडीएएस तंत्रज्ञान देखील दिले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार जर टाटा हॅरियर इलेक्ट्रिक कारची रेंज पाहिली तर एका चार्जवर सुमारे 600 किलोमीटरची रेंज ती देऊ शकते.
2- टाटा सफारी ईव्ही- प्रसिद्ध असलेली टाटा सफारी आता इलेक्ट्रिक वेरियंटमध्ये अवतरणार असून ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कारमध्ये हा एक चांगला पर्याय असू शकतो. टाटा सफारी इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले,
डुएल झोन एसी, पॅनोरेमिक सनरूफ, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सात एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा तसेच इलेक्ट्रॉनिक सुविधा यामध्ये मिळणार आहेत. तसेच एडीएएस तंत्रज्ञान देखील असणार आहे. जर आपण करण्यात आलेल्या दाव्यानुसार बघितले तर टाटा सफारी इलेक्ट्रिक कार ग्राहकांना एका चार्जवर पाचशे किलोमीटरची रेंज देऊ शकते.
3- टाटा सिएरा इलेक्ट्रिक कार- टाटा मोटर्सच्या माध्यमातून नवीन इलेक्ट्रिक कार सिएरा लॉन्च केली जाणार असून इलेक्ट्रिक कार या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत दाखल होईल अशी शक्यता आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh ते 80kWh बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो. ही कार ग्राहकांना एका चार्जवर 500 किलोमीटर पेक्षा जास्तीची रेंज ऑफर करू शकते.