इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! लॉन्च झाली ‘ही’ नवीन 150 किलोमीटरची रेंज देणारी नवी Electric Scooter

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Electric Scooter : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शासनाने इलेक्ट्रिक वाहनांबाबत केलेली जनजागृती. शासनाच्या जनजागृतीमुळे आणि सुरुवातीच्या टप्प्यात इलेक्ट्रिक वाहनांना दिलेल्या अनुदानामुळे सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे.

अनेक जण आता इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशात ओलाला टक्कर देण्यासाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे.

सिंपल एनर्जी या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने नुकतेच सिम्पल डॉट वन या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे. विशेष म्हणजे ही गाडी 99,999 रुपये एवढ्या एक्स शोरूम किमतीत ही स्कूटर लॉन्च केली आहे.

पण ही प्राईज इंट्रोडक्टरी प्राईस आहे. अर्थातच जे लोक या स्कूटरची प्री बुकिंग करतील त्यांनाच या किमतीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या स्कूटरची नवीन किंमत जानेवारी 2024 मध्ये जाहीर होऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फिचर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सध्या कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त एकाच प्रकारातचं लॉन्च केली आहे. मात्र भविष्यात या इलेक्ट्रिक स्कूटरचे इतरही वेरियंट बाजारात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. डॉट वन स्कूटरमध्ये फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केली की, 151Km पर्यंत धावणार असा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही गाडी चार कलर मध्ये बाजारात लॉन्च झाली आहे. नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट आणि अझर ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ही गाडी बाजारात उतरवण्यात आली आहे. ग्राहकांना आपल्या आवडीचा कलर यातून निवडता येणार आहे. दरम्यान ग्राहकांच्या आवडीनुसारच या गाडीचे कलर ठरवण्यात आले आहेत.

डॉट वन 750W चार्जरसह येते. ही गाडी खूपच दमदार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 2.7 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास एवढा वेग पकडू शकते असा अंदाज आहे. ही स्कूटर 3.7kWh बॅटरी पॅकसह ऑफर केली जात आहे.

यात 8.5kW इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 72Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. या ई-स्कूटरमध्ये 12-इंचचे चाके आहेत. यात टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट पॅनल, CBS, दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि 35-लिटर अंडर-सीट स्टोरेज देण्यात आले आहे.

याला एप्लीकेशनची कनेक्टिव्हिटी देखील राहणार आहे. ही गाडी ओलाला टक्कर देणार असा दावा होत आहे. दरम्यान या गाडीची इंट्रोडक्ट्री प्राईस जाहीर झालेली असली तरी देखील प्रत्यक्षात या गाडीची किंमत काय राहणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.