KIA Electric SUV : मार्केटमध्ये धमाका ! 500 किमी रेंजसह किया लाँच करणार ‘ही’ जबरदस्त कार ; जाणून घ्या त्याची खासियत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KIA  Electric SUV :  मागच्या काही महिन्यांपासून देशात दररोज ग्राहकांना (customers) आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात (Indian market) नवीन नवीन इलेक्ट्रिक कार (electric cars) लाँच होत आहे. कोरोना काळानंतर (After corona period) पुन्हा एकदा भारतीय ऑटोमार्केट मध्ये गर्दी होत आहे.

यामुळेच अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना विविध ऑफर देत आपली विक्री वाढवत आहे. यातच आता KIA मोटर इंडिया (KIA Motor India) लवकरच आपल्या इलेक्ट्रिक कारसह ऑटो मार्केटमध्ये (auto market) प्रवेश करणार आहे. वास्तविक KIA आपली इलेक्ट्रिक SUV (electric SUV) भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.

या कारचे नाव Kia EV9 असेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार 2023 पर्यंत बाजारात येऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारला पहिल्यांदाच नोव्हेंबर 2021 LA ऑटो शोमध्ये (LA Auto Show) समोर आणेल होते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार एका चार्जवर 500 किमीची रेंज देईल. त्याचबरोबर यामध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही आहे. 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतील. कंपनीने या कारमध्ये काही बदल केले आहेत. यामध्ये हिल डिसेंट कंट्रोल बटणाला दुसरी जागा देण्यात आली आहे. यासोबतच लॉक अनलॉक पिन लॉकचे बटणही बदललेले दिसेल. एंटीरियर व्हील आधी उजव्या बाजूला देण्यात आले होते, परंतु आता ते सेंटर कन्सोलमध्ये फिक्स केले गेले आहे.

कंपनी ही कार 4 एक्सटीरियर पेंट स्कीममध्ये ऑफर करेल. हे 4 रंग पर्यायांसह ऑफर केले जाईल, ज्यात नेपोली ब्लॅक (Napoli Black), गॅलेक्सी ग्रे (Galaxy Grey), एक्वा मरीन (Aqua Marine) आणि रेड (Red) यांचा समावेश आहे.