Kia आकर्षक डिझाईन अन 500 किलोमीटर रेंज असलेली EV9 इलेक्ट्रिक SUV लाँच करणार ! भारतीय बाजारात केव्हा एन्ट्री होणार ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kia EV9 Electric Suv : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, वाढते प्रदूषण या साऱ्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित केले जात आहे. विशेष म्हणजे भारतीय नागरिकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दाखवली आहे.

यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत बनवण्यास सुरुवात केली आहे. ऑटो कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक वाहन तयार करत आहेत.

सध्या स्थितीला भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे. टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये 75% हिस्सेदारी आहे. कंपनी अजूनही अनेक नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स वर काम करत आहे.

अशातच आता किया ही दक्षिण कोरियाई कंपनी एक नवीन इलेक्ट्रिक SUV वर काम करत असल्याची बातमी समोर आली आहे. ही कंपनीची एक फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार राहणार आहे.

विशेष म्हणजे ही कार भारतीय बाजारात देखील लॉन्च केली जाणार आहे. याबाबत गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्येच पुष्टी करण्यात आली होती. दरम्यान नुकतेच हे वाहन चाचणीदरम्यान दिसले आहे.

त्यामुळे नजीकच्या काळात भारतीय बाजारपेठेत ही कार लॉन्च होणार हे जवळपास नक्की झाले आहे. कंपनी लवकरच EV9 फ्लॅगशिप SUV ही कार फ्लॅगशिप वाहन म्हणून लॉन्च करणार आहे.

Kia EV9 संकल्पना 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि उत्पादन आवृत्तीने गेल्या वर्षी जागतिक स्तरावर पदार्पण केले होते.

दरम्यान, लॉन्च झाल्यानंतर भारतात या गाडीची किंमत एक करोडच्या आसपास राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच्या लाँच बाबत अजूनही स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही.

या गाडीच्या स्पेसिफिकेशन बाबत बोलायचं झालं तर जागतिक स्तरावर, त्याच्या बेस स्पेक व्हेरिएंटला 76.1 kWh बॅटरी पॅक मिळतो, जो 358 किमीची रेंज ऑफर करतो आणि एक्सल-माउंटेड 215 bhp इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे.

यात आणखी एक प्रकार देखील उपलब्ध आहे जो 99.8 kWh आहे. हे एका चार्जवर 541 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. यामुळे आता ही कार भारतीय बाजारात केव्हा लॉन्च होणार ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.