आता कसले मारुती आणि टाटा,आता चालेल किआचा धमाका! ‘या’ तारखेला लॉन्च होत आहे कियाची दमदार इंजिन असलेली एसयुव्ही कार

भारतीय कार बाजारपेठेमध्ये वर्चस्व असलेल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स तसेच महिंद्रा या कंपन्यांचा समावेश होतो. परंतु यासोबतच स्कोडा तसेच किया सारख्या कंपन्यांच्या कार देखील भारतीय बाजारपेठेमध्ये तितकेच वर्चस्व ठेवून आहेत.

Ajay Patil
Published:
kia syros

Kia Syros SUV:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये वर्चस्व असलेल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स तसेच महिंद्रा या कंपन्यांचा समावेश होतो. परंतु यासोबतच स्कोडा तसेच किया सारख्या कंपन्यांच्या कार देखील भारतीय बाजारपेठेमध्ये तितकेच वर्चस्व ठेवून आहेत.

यामध्ये जर आपण किया कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीचा सोनेट हा एकमेव सेगमेंट अगोदर होता व आता या सेगमेंटमध्ये Syros चा समावेश होणार आहे. किया कंपनीची ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही किया सिरोस लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे.

काय आहेत या कारमधील फीचर्स?
कीयाच्या या नवीन Syros मध्ये मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस चार्जर तसेच टाईप सी चार्जिंग पोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल तसेच नवीन स्टेरिंग व्हील, पॅनोरेमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा तसेच रियर एसी व्हेंट्स,

रिक्लायनिंग रियर सीट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सुरक्षाकरिता सहा एयरबॅग्स आणि सहा स्पीकर सह उत्कृष्ट असे ऑडिओ सिस्टम, EBD आणि ब्रेक असिस्ट अशा अनेक सुविधा यामध्ये मिळण्याची शक्यता आहे.

कसे असेल या कारचे इंजिन?
कंपनीच्या या नवीन Kia Syros एसयुव्हीमध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे व हे इंजिन मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह येईल. तसेच ही एसयूव्ही एका लिटरमध्ये 18 ते 20 km चे मायलेज देऊ शकते.

तसेच या कारमध्ये सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय देखील मिळेल अशी एक शक्यता आहे. तसेच डिझाईन हे बॉक्सि असण्याची शक्यता आहे व बाहेरील डिझाईनला एक उत्कृष्ट असा प्रीमियम फील मिळावा याकरिता एलईडी हेडलॅम्प डीआरएल,

फ्लश फिटिंग डोअर हँडल, स्क्वेअर ऑफ व्हील आर्च, लॉन्ग रूफ रेल व ब्लॅक आऊट सी पीलर आहेत. तसेच या कारची केबिन ही सेल्टोस एसयूव्ही सारखी असेल अशी एक शक्यता आहे. त्यामध्ये ड्युअल टोन इंटिरियर थीम पाहिली जाऊ शकते. तसेच या एयूव्हीमध्ये दोन स्पोक असलेली स्टेरिंग व्हील असेल अशी एक शक्यता आहे.

तसेच या कारची किंमत ही किफायतशीर असेल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.किया आपली ही पुढील कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Syros 19 डिसेंबर रोजी भारतात लॉन्च करणार आहे व त्याच दिवशी या कारची किंमत जाहीर केली जाईल अशी एक शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe