Kia Siros SUV:- भारतामधील प्रमुख कार उत्पादक कंपन्या जर बघितल्या तर यामध्ये प्रामुख्याने टाटा आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.या दोन्ही कार उत्पादक कंपन्यांनी भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळे कारचे मॉडेल्स लॉन्च केले असून ग्राहकांच्या आवडीनुसार आणि ग्राहकांना परवडेल अशा किंमतींमध्ये कार लॉन्च केलेले आहेत.
या कंपन्यांसोबत काही विदेशी कंपन्या देखील भारतीय कार बाजारपेठेत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये दक्षिण कोरियाची किया ही कंपनी देखील भारतामध्ये हळूहळू विस्तार करत आहे.
भारतीय कार बाजारपेठेत कियाने आतापर्यंत कार्निवल आणि सेलटॉस यासारख्या उत्तम अशा कार बाजारपेठेत आणलेल्या आहेत व आता किया कंपनी एसयुव्ही प्रकारातील एक नवी कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. या कारचे नाव सिरॉस असे असणार आहे. किया कंपनीची जी काही सॉनेट कार आहे त्यापेक्षाही उच्च दर्जाची व उच्च श्रेणीतील ही कार असणार आहे.
काय नवीन राहील कीयाच्या सिरॉस या कारमध्ये?
कियाची सिरॉस ही सब चार मीटर एसयुव्ही असून तिला इंटिग्रेटेड एलइडी आकाराचे लाईट्स, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, बंपरच्या वरती व्हर्टिकल एलईडी एक्सेंट, एक शार्क फिन अँटेना आणि एक इंटिग्रेटेड स्पॉयलर असणार आहे. कियाची जी काही सॉनेट कार आहे त्यापेक्षा तुलनेने सिरॉस कारमध्ये केबिन स्पेस आणि लेग स्पेस देखील जास्त असणार आहे.
तसेच पुढच्या भागात व्हर्टिकल एलईडी लाइटिंग एलिमेंट्स असतील व वळणासाठी इंडिकेटर्स म्हणून ते काम करतील. या कारचे बोनेट क्लेमशेल डिझाईनमध्ये असणार आहे. तसेच या कारला 16 इंचांची अलॉय व्हिल्स देण्यात आली आहेत.
कसे असेल या कारचे इंजिन?
या कारमध्ये 1.2- लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 82 बीएचपी पावर आणि 114 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करेन. या कारच्या इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहे.
सेच या कारचे सीएनजी मॉडेल यापेक्षा किफायतशीर असण्याची शक्यता आहे. त्याच्या हाय ट्रिम्पसवर 1.0 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन असू शकते. त्यामधून 118 बीएचपीची पावर आणि 172 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करेल.
काय असतील इतर वैशिष्ट्ये?
कीयाच्या सिररॉस मध्ये 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच 10.25 इंचाची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पॅनोरमिक सनरूफ अशी वैशिष्ट्ये देखील असतील.
तसेच पुढे व्हेंटिलेटेड सीट्स, ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम, 360 अंशामध्ये फिरणारा कॅमेरा तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ॲम्बीयंट लाइटिंग अशी तर फीचर्स देखील मिळतील.
किती असू शकते या कारची किंमत?
कियाच्या सिरॉस या एसयुव्ही कारची प्राथमिक किंमत दहा लाख रुपये पेक्षा जास्त नसेल असा एक अंदाज आहे.