Mahindra Thar Earth: महिंद्रा थारची ‘अर्थ एडिशन’ जबरदस्त लुकसह लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Thar Earth:- भारतामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा हे नाव डोळ्यासमोर आले तरी आपल्यासमोर एक प्रसिद्ध असलेली अनेक प्रकारची वाहने निर्मिती करणारी कंपनी डोळ्यासमोर येते. महिंद्रा कंपनीने आतापर्यंत  ट्रॅक्टर व अनेक लक्झरी वाहने उत्पादित केलेली आहेत.

एवढेच नाही तर महिंद्रा कंपनी ही भारतातील आघाडीची व प्रसिद्धी एस यु व्ही उत्पादक कंपनी म्हणून देखील लोकप्रिय आहे.अगदी सामान्य नागरिकांना परवडतील या किमती पासून ते आकर्षक लूक व भन्नाट फीचर्स असलेल्या अनेक कार देखील या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेले आहेत.

या कंपनीची जर आपण महिंद्रा थार ही कार पाहिली तर महिंद्राची ही लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही कार असून नुकतीच कंपनीच्या माध्यमातून या एसयुव्ही थारचे स्पेशल एडिशन अर्थ लॉन्च करण्यात आलेले आहे. या वर्जनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करून ही नवीन एडिशन लॉन्च करण्यात आलेली आहे.

 महिंद्रा थार अर्थ एडिशनची वैशिष्ट्ये

ही नवीन एडिशन पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्स ट्रान्समिशनसह ऑफर केली जात असून महिंद्रा कंपनीची ही नवीन कार स्पेशल अर्थ एडिशन थोर डेझर्टशी प्रेरित आहे. म्हणजेच महिंद्रा थारचे हे अर्थ एडिशन वाळवंटी थीमवर तयार करण्यात आले आहे.

कंपनीच्या माध्यमातून या एडिशनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच ही कार स्टॅंडर्ड मॉडेल पेक्षा वेगळी दिसते. ही कार  LX हार्ड टॉप 4×4 लुकमध्ये चार प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

जर आपण या नवीन एडिशन मधील इंजिनचा विचार केला तर यामध्ये 2.0- लिटर पेट्रोल आणि 2.2- लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेली असून जे सहा स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह जोडलेले आहेत.

तसेच डिझाईनमध्ये पाहिले तर या अर्थ एडिशनला डेझर्ट प्युरी सॅटिन मॅट पेंट आणि दरवाजांवर डून प्रेरित डेकल्स, बी पिलरवर अर्थ एडिशन बॅजिंग, मॅट ब्लॅक बॅज आणि सिल्वर आलोय व्हील मिळतात.

 किती आहे किंमत?

जर आपण या नवीन एसयूव्हीच्या किमती बद्दल विचार केला तर पेट्रोल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत पंधरा लाख 40 हजार रुपये आहे.

तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत सोळा लाख 99 हजार रुपये असून डिझेल व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 16 लाख 15 हजार रुपये इतकी आहे. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 17 लाख 60 हजार( एक्स शोरूम) रुपये आहे.