Mini Tractor: शेती कामासाठी पॉवरफुल आणि कमी किमतीतला मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर महिंद्राचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत

Ajay Patil
Published:
mahindra oja mini tractor

Mini Tractor:- भारतामध्ये शेतकरी ज्या ज्या कंपन्यांचे ट्रॅक्टर शेतीमध्ये वापरतात किंवा खरेदी करतात त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर मॉडेल्सला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. महिंद्राने आतापर्यंत भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक शेतीपयोगी महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेली पावरफुल अशी ट्रॅक्टर लॉन्च केली असून  शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरचा खूप मोठा फायदा शेतीत होताना आपल्याला दिसून येतो.

याव्यतिरिक्त महिंद्राच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर देखील तयार करण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये महिंद्राचे मिनी ट्रॅक्टर विशेष लोकप्रिय आहेत व यामध्ये जर आपण शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असलेले मिनी ट्रॅक्टरचा विचार केला तर ते आहे महिंद्रा ओजा 2130 हे मिनी ट्रॅक्टर होय. याच महत्त्वपूर्ण अशा ट्रॅक्टर बद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 महिंद्रा ओजा 2130 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये कंपनीच्या माध्यमातून पावरफुल असे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते 30 एचपी पावर आणि 83.7 एनएम कमाल टॉर्क जनरेट करते. तसेच या मिनी ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 25.4 एचपीची असून त्याचे इंजिन तीन हजार आरपीएम जनरेट करते.

महिंद्रा ओजा 2130 मिनी ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 950 किलो इतकी ठेवण्यात आली असून कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एयर  फिल्टर दिलेला आहे. हा एक मजबूत ट्रॅक्टर असून त्याचा ग्राउंड क्लिअरन्स देखील उच्च ठेवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहे.

 महिंद्रा ओजा 2130 ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने टिल्ट आणि टेलिस्कोपिक पावर टाईप स्टेरिंग दिली आहे. तसेच कंपनीचा हा ट्रॅक्टर 12 फॉरवर्ड+ 12 रिव्हर्स गिअरसह गिअर बॉक्समध्ये उपलब्ध आहे. तसेच या मिनी ट्रॅक्टरला सिंक्रो शटल प्रकारच्या ट्रान्समिशनसह कॉन्स्टंट जाळी देण्यात आली आहे.

तसेच यामध्ये ऑइल एमर्स ब्रेक देण्यात आलेले असून ट्रॅक्टरवर मजबूत पकड ठेवण्यासाठी ते सक्षम आहेत. त्याचे ट्रान्समिशन मजबूत असल्यामुळे ते द्राक्ष बागा, इतर फळबागांच्या उत्कृष्ट कामासाठी महत्त्वाचे असे ट्रॅक्टर आहे व यामध्ये ऑटो पीटीओ, ऑटो स्टार्ट, जीपीएस लाईव्ह लोकेशन आणि डिझेल मॉनिटर सारखे अनेक वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

भारतामध्ये महिंद्रा ओजा 2130 मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख 95 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणची  आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे किमतीत काही बदल होऊ शकतो. यासोबतच कंपनीने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सहा वर्षाच्या वारंटीसह उपलब्ध करून दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News