Mahindra Tractor:- कृषी यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर आता शेताच्या विविध कामांकरिता मोठ्या प्रमाणावर केला जात असून कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून शेतीतील विविध यंत्र खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
शेतीमध्ये विविध प्रकारचे जे यंत्र वापरले जातात त्यामध्ये ट्रॅक्टर हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. शेतीची पूर्व मशागतीपासून तर आंतरमशागतीची कामे व पिकांच्या काढणीपर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टर चलीत यंत्राच्या साह्याने केली जातात व यामध्ये ट्रॅक्टरची भूमिका खूप महत्त्वाचे असते.
त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर घ्यायला पसंती देतात. भारतामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपल्याला दिसतात. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने अनेक महत्वाची वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत अनेक ट्रॅक्टर मॉडेल्स आजपर्यंत भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. परंतु त्यातल्या त्यात काही मॉडेल्स हे टॉप असून शेतकऱ्यांना परवडणारे आहेत. त्यामुळे या लेखात आपण महिंद्रा अँड महिंद्राच्या काही टॉप ट्रॅक्टर मॉडेलची माहिती घेऊ.
ही आहेत महिंद्रा अँड महिंद्राची टॉप ट्रॅक्टर मॉडेल
1- महिंद्रा जिओ 245 डीआय ट्रॅक्टर– महिंद्रा अँड महिंद्राच्या या ट्रॅक्टर मध्ये १३६६ क्षमतेसह दोन सिलेंडर मध्ये वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. जे 24 एचपी पावरसह 81 एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रॅक्टरची जास्तीत जास्त पीटीओ पावर 22 एचपी असून या ट्रॅक्टरचे इंजिन 2300 rpm जनरेट करते.
या ट्रॅक्टरची लोडिंग कपॅसिटी 750 किलो इतकी आहे. यामध्ये सिंगल ड्रॉप आर्म पॉवर स्टेरिंग देण्यात आलेली असून यामध्ये आठ फॉरवर्ड व चार रिव्हर्स गिअर्स असलेला गीयर बॉक्स देण्यात आलेला आहे. महिंद्राच्या या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख तीस हजार ते पाच लाख 45 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले आहे व यासोबत पाच वर्षाची वारंटी देण्यात येते.
2- महिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर– या ट्रॅक्टरमध्ये 2979 सीसी क्षमतेचे चार सिलेंडर लिक्विड कुलंट कुल्ड इंजिन देण्यात आले असून जे 47 एचपी पावरसह 192 एनएम टॉर्क जनरेट करते. महिंद्राच्या या ट्रॅक्टरचे इंजिन २००० आरपीएम जनरेट करते. याची कमाल पीटीओ पावर 42 एचपीची असून हायड्रोलिक क्षमता ही 1480 किलोग्राम इतकी आहे.
या ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर्स सोबत ड्युअल एक्टिंग पावर/ मेकॅनिकल स्टेरिंगसह एक गिअर बॉक्स दिला आहे. हा ट्रॅक्टर दोन व्हिल ड्राईव्ह मध्ये येतो. महिंद्राच्या या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सहा लाख 90 हजार ते सात लाख 27 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे व यासोबत कंपनी सहा वर्षाची वॉरंटी देते.
3- महिंद्रा अर्जुन नोव्हो 605 डीआय ट्रॅक्टर– या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 3531 सीसी क्षमतेच्या चार सिलेंडर मध्ये कुलंट इंजिन दिलेले असून ते 57 एचपीसह 213 एनएम टॉर्क जनरेटर करते. महिंद्रा कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये 50.3 एचपी मॅक्स पिटीओ पावर आहे. या ट्रॅक्टरचे इंजन 2100 आरपीएम जनरेट करते.
अर्जुन सिरीजचे हे ट्रॅक्टर असून याची हायड्रोलिक क्षमता 2200 किलो इतकी आहे. या ट्रॅक्टरमध्ये 15 फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर सोबत पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हा दोन व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत आठ लाख 75 हजार ते आठ लाख 95 हजार इतकी ठेवण्यात आली आहे व त्यासोबत दोन वर्षाची वारंटी देण्यात येते.
4- महिंद्रा ओजेए 3140 ट्रॅक्टर– या ट्रॅक्टरमध्ये पावरफुल असे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते 40 एचपी पावरसह 133 एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 34.8 एचपीची आहे. तसेच इंजिन 2500 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक कॅपॅसिटी 950 किलो इतकी ठेवण्यात आली आहे.
यामध्ये बारा फॉरवर्ड व बारा रिव्हर्स गिअर्स असलेला गिअरबॉक्स सह पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हा ट्रॅक्टर चार व्हिल ड्राईव्ह मध्ये येतो. या ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत सात लाख 35 हजार ते सात लाख 40 हजार रुपये ठेवण्यात आली आहे व त्यासोबत सहा वर्षाची वॉरंटी देण्यात येते.