Car News : 29 एप्रिलला लॉन्च होणार महिंद्राची ही नवीन अनोखी SUV! वैशिष्ट्ये पहाल तर व्हाल चकित; वाचा किती रुपयात करता येईल बुकिंग?

Ajay Patil
Published:
Car News

Car News :- भारतामध्ये ज्या काही आघाडीच्या आणि प्रसिद्ध असलेल्या वाहन निर्मिती कंपन्या आहेत त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महिंद्रा अँड महिंद्रा ही कारनिर्मितीतच नाही तर अनेक व्यावसायिक वाहने व ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित उपकरणे निर्मितीमध्ये देखील आघाडीवर आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील महिंद्रा अँड महिंद्रा हे नाव खूप प्रसिद्ध आणि विश्वासाचे आहे. तसेच कार निर्मितीच्या बाबतीत बघितले तर या कंपनीकडून अनेक नवनवीन वैशिष्ट्य असलेले कार मॉडेल बाजारात आणले जातात व आता महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी भारतामध्ये नवीन महिंद्रा XUV3X0 लॉन्च करण्याच्या तयारीत असून ही नवीन एसयूव्ही 29 एप्रिल रोजी भारतामध्ये लॉन्च होणार आहे.

महत्वाचे म्हणजे ही कार लॉन्च करण्यापूर्वी महिंद्राने येणाऱ्या या नवीन एसयुव्ही कारचे टीझर शेअर केले आहेत. या टीझरच्या माध्यमातून दिसून येते की या गाडीमध्ये नवीन इंटिरियर डिझाईन करण्यात आलेले आहे व हे नवीन डिझाईन महिंद्राच्या XUV400 मॉडेल पासून प्रेरित असणार आहे.

यासोबतच या एसयुव्हीमध्ये मोठी 26.04cm टचस्क्रीन आणि इन्फोटेनमेंट साठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असण्याची देखील अपेक्षा आहे. तसेच या नवीन एसयूव्हीमध्ये वायरलेस चार्जर, हाउ टू मेक क्लाइमेट कंट्रोल आणि नवीन अपहोलस्ट्री दिली जाऊ शकते.

तसेच या कार मध्ये मागील बाजूस कनेक्ट लाईट देखील असणार आहेत. तसेच टीझरमध्ये असे दिसून आले आहे की यामध्ये हवीशी जागा आणि प्रीमियम साऊंड सिस्टम देखील असणार आहे. सध्या कारमध्ये पुन्हा डिझाईन केलेले फ्रंट ग्रील, एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स आणि हेडलाइट्स दिले जातील.

कसे असेल महिंद्राच्या नवीन XUV3X0 एसयूव्हीचे इंजिन?

या नवीन एसयुव्हीमध्ये सध्या असलेल्या XUV300 सारखे इंजिन पर्याय मिळतील अशी एकापेक्षा असून यामध्ये दोन टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन समाविष्ट असू शकते.

हे पेट्रोल इंजिन अनुक्रमे 108 बीएचपी पावर आणि 200nm टॉर्क जनरेट करेल आणि 128 बीएचपी पावर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करतात.

शिवाय डिझेल इंजन 115 बीएचपी पावर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबतच सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि सहा स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

किती रुपयांमध्ये करू शकतात बुकिंग?

सध्याही नवीन कार लॉन्च करण्यापूर्वी महिंद्रा कंपनीने या सर्व कॉम्पॅक्ट एसयुव्ही करिता बुकिंग सुरू केले असून 21 हजार रुपयांचे टोकन रक्कम भरून काही निवडक महिंद्रा डीलरशिपवर ही कार बुक केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe